हिमाचल प्रदेशच्या कुल्लूजवळ ५०० फूट दरीत बस कोसळली, मृतांचा आकडा ४३ वर
कुल्लू - हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील बंजारजवळ एक खासगी बस ५०० फूट दरीत कोसळली. बंजारपासून एक किलोमीटरवरील भियोठ वळणावर हा अपघात घडला. या अपघातात ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये जवळपास ७० च्या आसपास प्रवासी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर
शरद गवत आण... छगन कमळ बघ... मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना धमाकेदार उत्तर
मुंबई - राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधकांनी बालभारतीच्या दुसरीच्या पुस्तकातील संख्यावाचनावरून सरकारवर जोरदार टीका केली होती. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचीही खिल्ली उडवली असून त्यांनी 'शरद गवत आण..., छगन कमळ बघ...., दादा कमळ बघ..., असे वक्तव्य करत विरोधकांना डिवचले, त्यामुळे विधानसभेत एकच हास्यकल्लोळ उडाला. वाचा सविस्तर
देवदर्शनाला आली पतीसोबत; धूम ठोकली प्रियकरासोबत, पाहा व्हिडिओ
अहमदनगर - अवघ्या ३ दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नववधूने धूम स्टाईलने आपल्या प्रियकरासोबत धूम ठोकल्याची घटना घडली. देवदर्शनाला पतीसोबत आलेल्या नव्या नवरीने प्रियकरासोबत धूम ठोकल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील मढी येथे घडली. हा पलायन नाट्याचा प्रकार मात्र, देवस्थानच्या विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वाचा सविस्तर
'तेरी मेरी जोडी, मिळून करु लग्नात चोरी'; लग्नात दागिने-पैशांवर डल्ला मारणारे दाम्पत्य अटकेत
पुणे - जिल्ह्यात विविध ठिकाणी मंगल कार्यालयात जाऊन वऱ्हाडी मंडळीचे दागिने आणि रोख रक्कमेवर डल्ला मारणाऱ्या नवरा-बायकोच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. विलास मोहन दगडे आणि त्याची पत्नी जयश्री विलास दगडे, असे या भामट्या चोरांची नावे आहेत. वाचा सविस्तर
'आमचा मलिष्कावर भरोसा हाय.. हाय...' RJ मलिष्कासाठी बीएमसीच्या पायघड्या
मुंबई - मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांवरून 'सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय' या गाण्यातून आरजे मलिष्काने पालिकेला धारेवर धरले होते. यानंतर मुंबई पालिका पदाधिकारी आणि सत्ताधारी नगरसेवकांच्या रोषालाही ती सामोरी गेली होती. आता पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा पहिले पाढे पंच्चावन्न होऊ शकतात. अशावेळी मलिष्का पुन्हा बरसू शकते. म्हणूनच 'रेड एफएम 93.5' फेम आरजे मलिष्का व त्यांच्या सहकाऱ्यांनाच पालिकेने त्यांची काम मुंबईकरांपर्यत पोहोचवण्यासाठी आज निमंत्रित केले होते. वाचा सविस्तर