ETV Bharat / state

आज.. आत्ता.. सायंकाळी ७ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर... - bulletin

मुंबईतील सायन रुग्णालयात बिल कमी करण्याचे आमिष दाखवून रुग्णाच्या बहिणीवर जिन्यावरच बलात्कार करण्याची घटना घडली. यंदा सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडणार असून मान्सून ४ जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे. मुंबईत जीएसटी अधिकाऱ्याची वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ३० व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. पंजाब स्वातंत्र्यासाठी लढत असताना आरएसएस ब्रिटीशांची चमचेगिरी करत होते असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला.

आज.. आत्ता.. सायंकाळी ७ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर...
author img

By

Published : May 14, 2019, 6:59 PM IST

मुंबईमध्ये बिल कमी करण्याचे आमिष, सायन रुग्णालयात रुग्णाच्या बहिणीवर जिन्यावरच बलात्कार
मुंबई - सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाच्या बहिणीवर पाचव्या मजल्यावरील जिन्यावरच लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना ११ मे (शनिवारी) उघडकीस आली. या प्रकरणी सायन पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून धारावीत राहणार्‍या ३१ वर्षीय दीपक अण्णापा कुंचिकुर्व्हे या व्यक्तीला अटक केली. या घटनेमुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणार्‍या रुग्णांच्या महिला नातेवाईकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाचा सविस्तर..

दिलासादायक.. यंदा सरासरीच्या ९३ टक्के मान्सून.. ४ जूनला केरळमध्ये होणार दाखल
नवी दिल्ली - चातकासारखे अनेकांचे डोळे लागून राहिलेल्या मान्सूनबाबत दिलासादायक वृत्त आहे. केरळमध्ये मान्सून ४ जूनमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. वाचा सविस्तर..

मुंबईत जीएसटी अधिकाऱ्याची वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ३० व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या
मुंबई - मुंबईत जीएसटी अधीक्षक हरेंद्र कपाडिया (५१) यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील बहुमजली वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारतीच्या ३० व्या मजल्यावरुन उडी मारून कपाडिया यांनी आपले जीवन संपवले. सोमवारी रात्री ही घटना घडली. वाचा सविस्तर..

पंजाब स्वातंत्र्यासाठी लढत असताना आरएसएस ब्रिटीशांची चमचेगिरी करत होते - प्रियांका गांधी
भटिंडा - जेंव्हा संपूर्ण पंजाब हा स्वातंत्र्यासाठी लढत होता, तेंव्हा आरएसएसचे लोक हे ब्रिटीशांची चमचेगिरी करत होते, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केला. त्या पंजाबमधील भटिंडा येथे बोलत होत्या. वाचा सविस्तर..

आरोग्यवर्धक लग्नपत्रिका : पर्यावरण संवर्धनासाठी निमंत्रण पत्रिकेसोबत शेवग्याच्या बिया
वर्धा - बरबडी इथल्या केळवतकर कुटुंबीयांकडे सध्या लग्नाची धामधुम सुरू आहे. हे लग्न स्मरणात राहावे म्हणून सगळे एक आरोग्य-धनसंपदा देणारे गिफ्ट पत्रिकेसोबत जोडत आहेत. ही पत्रिका आहे पूनमच्या विवाहाची. १९ मे रोजी अशोकनगर येथील नीरज महादेव मोटघरे यांच्यासोबत होणाऱ्या विवाहाची. या विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे पत्रिकेसोबत तांदळाच्या अक्षतेऐवजी शेवग्याच्या बिया दिल्या जाणार आहेत. यात आरोग्यवर्धक शेवग्याच्या बियांसोबत ’एक पाऊल स्वच्छतेकडे’, ’बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ’सारे शिकुया, पुढे जाऊया’, ’जंगल वाचवा, देश वाचवा’ असे महत्त्वपूर्ण संदेश पत्रिकेत देण्यात आले आहेत. वाचा सविस्तर..

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.