मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी (दि. 14 जून) आत्महत्या करत आपले जीवन संपवले. वांद्रे येथील पाली हिल भागात राहत्या घरी गळफास लावून त्यानो आत्महत्या केली होती. ही घटना उघडकीस येताच पोलिसांच्या त्याचा मृतदेह शवविच्छेदनाला पाठवला होता. त्याचे अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाले असून ही आत्महत्याच असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
वाचा सविस्तर - सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट, आज होणार अंत्यसंस्कार
इगतपुरी(नाशिक)- इगतपुरी तालुक्यातील ओंडली शिवारात दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या युवकाच्या बेवारस मृतदेह प्रकरणाचा उलगडा करण्यात घोटी पोलिसांना अवघ्या काही तासातच यश आले आहे. मृत युवक त्याच्या प्रेयसीच्या लग्नामध्ये अडथळा ठरेल, या भीतीने प्रेयसीच्या आईने दोन व्यक्तींच्या मदतीने हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत युवकाचे नाव पंडित ढवळू खडके असे आहे. पोलिसांनी या प्रकरणी युवकाच्या प्रेयसीच्या आईला आणि इतर दोघांना अटक केली आहे.
वाचा सविस्तर - मुलीच्या प्रियकराचा आईनेच काढला काटा; इगतपुरी तालुक्यातील घटना
नवी दिल्ली - देशात गेल्या चोवीस तासांमध्ये नव्या रुग्णांनी 11 हजाराचा आकडा पार केला. देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखापेक्षा अधिक झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 11 हजार 502 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, 325 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
वाचा सविस्तर - देशात गेल्या 24 तासांत आढळले 11 हजार 502 कोरोनाबाधित ; तर 325 जणांचा बळी
अहमदनगर - राज्य सरकारकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, विरोधकांनी त्यातही राजकारण केले आहे. त्यामुळे आता या निर्णयावर कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया चालू आहेत. त्याबाबत लवकरच विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले आहे. रविवारी राहुरीत त्यांनी पत्रकांरांशी संवाद साधला.
वाचा सविस्तर - महाविद्यालयीन परीक्षांबाबत लवकरच विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल - प्राजक्त तनपुरे
मुंबई - मागील अडीच महिने अत्यावश्यक सेवा देण्यासाठी बसने प्रवास करत होतो. मात्र, आता लोकल सुरू झाल्यानंतर बसच्या गर्दीतून सुटका झाली असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी बळीराम लिगम यांनी दिली आहे.
वाचा सविस्तर - बसच्या गर्दीतून सुटका झाली, 'लोकल'प्रवास करणाऱ्यांची प्रतिक्रिया
बुलडाणा - जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी पुन्हा नवीन 5 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. या पाच रुग्णांपैकी मलकापूर येथील पारपेट भागातील 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान बुलडाणा येथे कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 5 झाली आहे. सदर व्यक्तीला 12 जून रोजी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
वाचा सविस्तर - बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा पोहचला 118 वर; 5 नवीन कोरोना रुग्णांची भर
नांदेड- जिल्ह्यात रविवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात एकही स्वॅब पॉझिटिव्ह न आल्याने नांदेड जिल्हावासियांनी मोठा दिलासा मिळाला आहे. पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील 6 बाधित व्यक्ती व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथील 2 बाधित तसेच कोविड केअर सेंटर माहूर येथील 1 असे 9 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 177 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.
वाचा सविस्तर - नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी... रविवारी सर्व अहवाल निगेटिव्ह , 9 रुग्ण कोरोनामुक्त
हिंगोली - जिल्ह्यातील विविध भागात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे सेनगाव तालुक्यातील नरसी नामदेव येथील सेनगाव ते हिंगोली रस्त्यावरील पर्यायी पूल वाहून गेला आहे. या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीसाठी हा पर्यायी पूल निर्माण करण्यात आला होता. मात्र तो पूल वाहून गेल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.
वाचा सविस्तर - हिंगोलीला पावसाचा तडाखा; पर्यायी पूल गेला वाहून
नंदुरबार - जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यासोबत वारा देखील मोठ्या प्रमाणावर वाहू लागल्याने काही काळ विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. 33 मी.मी.पावसाची नोंद झाली असून पाऊस आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वाचा सविस्तर - नंदुरबारमध्ये पावसाची जोरदार हजेरी ; 33 मी.मी.पावसाची नोंद
शिर्डी (अहमदनगर)- शिर्डी बसस्थानकासमोरील शनिवारी सकाळी नगरपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी २४ तासातच तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पैशाच्या कारणातून हा खून करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. शंकर उर्फ अण्णा असे मृताचे नाव आहे. तर राजेंद्र गवळी, सुनील जाधव, सुनील कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या तीन संशयित आरोपींची नावे आहेत.
वाचा सविस्तर - किरकोळ पैशांसाठी शिर्डीत एकाची निर्घृण हत्या, २४ तासात ३ आरोपी गजाआड