आज दिवसभरात/आजपासून -
- मुंबईच्या विविध ठिकाणी आज 5 दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन
- आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
- काही ठिकाणी मुसळधार सरींसह मध्यम, ते जास्त पाऊस पडण्याची शक्यता; नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वाशिम, पालघर, नाशिक, धुळे येथे अलर्ट जारी
- आज राष्ट्रीय हिंदी दिवस
- अकरावी ऑनलाईन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली. गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागेल.
- गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत दाखल झालेले चाकरमानी गणपती-गौरी विसर्जनानंतर १४ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू करणार आहेत. आतापर्यंत ८४० गाड्या आरक्षित झाल्याची माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली. १४ ते २२ सप्टेंबर कालावधीत जवळपास १५०० गाड्या परतीच्या दिशेने सुटणार आहेत.
- नागपुरात मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्डचे 18 व 45 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू राहिल. तर कोव्हॅक्सिनचे 18 व 45 वर्षावरील नागरिकांसाठी नमूद केंद्रांवर लसीकरण सुरू राहिल.
- बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झालं आहे. पुढील ४८ तासात उत्तर ओडीशा, उत्तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातून प्रवास करत पुढे सरकेल. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून पुढील चार दिवस काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
- राज्यातील महिला सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, नराधमांना वचक बसवा; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश वाचा सविस्तर...
- साकीनाका बलात्कार प्रकरण : आरोपीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; पीडितेच्या कुटुंबाला 20 लाखांची मदत वाचा सविस्तर...
- OBC Reservation : निवडणुका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करू - मंत्री वडेट्टीवार
- माझ्यावरील आरोप चुकीचे, सोमैयांवर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार - मंत्री मुश्रीफ
- माझ्या नावाने एखाद्याची झोप चांगली होत असेल तर चांगलेच, चंद्रकांत पाटलांचा मुश्रीफांना टोला
- दिलासादायक! देशात कोरोना लसीकरणाने ओलांडला 75 कोटींचा टप्पा
- मध्य प्रदेशमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात मिळणार उपनिषदासह पुराणाचे धडे! वाचा सविस्तर...
- मृत्यू प्रमाणपत्र न दिल्याने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची अधिकाऱ्यांना तंबी; पाहा VIDEO
- अहमदनगर - पारंपारिक बियाणे संवर्धनातून अकोले तालुक्याला देशात आणि विदेशात ओळख निर्माण करून देणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी बीज बँकेत विविध प्रकारच्या गावरान बिया जपल्या आहेत. त्याच बियांचा वापर करून गणपती बाप्पा साकारले आहेत. मनोभावे त्यांची दररोज पूजा केली जात आहे. पाहा व्हिडिओ
- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंताला 1 लाखाची लाच घेताना अटक वाचा सविस्तर...
- नीट परीक्षा घडल्यानंतर उत्तर पत्रिका 1 तास परीक्षार्थीकडे.. बुलडाण्यातील प्रकार वाचा सविस्तर...
- वाशिममध्ये गौराई म्हणून सुनांचीच पूजा; पाहा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
- 14 ऑगस्ट राशीभविष्य : आज 'या' राशीवाल्यांना होईल आर्थिक फायदा; जाणून घ्या आजचे राशीभविष्य