रायगडमध्ये काशीद बीचवर पोहण्यास गेलेले दोन पर्यटक बुडाले
रायगड - मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रात पोहण्यास गेलेले 2 जण बुडल्याची घटना सायंकाळी घडली. सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तीन पर्यटक काशीद समुद्र किनाऱ्यावर आले होते. यावेळी ते पोहण्यासाठी समुद्रामध्ये उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले. अभिषेक म्हात्रे (32, रा. पनवेल), पूजा शेट्टी (वय- 28 रा. कोपर खैरणे) असे बुडालेल्या दोघांची नावे आहेत. वाचा सविस्तर
बाडमेर दुर्घटनेचा Live व्हिडियो : रामकथा वाचकाने दिला इशारा... पळा, पळा... मंडप उडतोय
बाडमेर - जिल्ह्यातील जसोल गावात रविवारी श्री राम कथा सुरू असताना मंडप कोसळल्याने १५ जणांचा मृत्यू झाला. तर, ५० जण जखमी झाले. राम कथा सुरू असताना जोरदार वारा आणि पावसामुळे हा मंडप कोसळला. या घटनेचा लाईव्ह व्हिडियो समोर आला आहे. यात कथावाचक 'पावसाचा आणि वाऱ्याचा जोर वाढलाय. कथा थांबवावी लागेल. पळा, पळा... मंडप उडतोय. लोकांना बाहेर काढा. मंडप रिकामा करा. मंडप उडतोय... निघा निघा...' असा धोक्याचा इशारा भाविकांना देताना दिसत आहे. यानंतर कथावाचकानेही येथून त्वरेने काढता पाय घेतल्याचे व्हिडियोत दिसत आहे. वाचा सविस्तर
चव्हाणांनी माझ्यापेक्षा काँग्रेस पक्षाची काळजी करावी; राधाकृष्ण विखे-पाटलांची टीका
अहमदनगर - विरोधीपक्ष नेतेपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांना भाजपने थेट मंत्रिपद दिले. विखे पाटलांच्या या निवडीस न्यायालयातही आव्हान देण्यात आले आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विखे पाटलांची निवड ही बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. यावर विखे-पाटील म्हणाले, माझ्या मंत्रिपदाला आव्हान देणारी याचिका दाखल झाली आहे, ती न्यायप्रविष्ट विषय असल्याने मी त्यावर जास्त बोलणार नाही, मात्र पुथ्वीराज चव्हाण यांनी माझी काळजी करण्यापेक्षा स्वत: ची आणि ते मुख्यमंत्री असताना जी पक्षाची अधोगती झाली याची काळजी करण्याची आवशकता आहे, अशी टीका गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांनी चव्हाण यांच्यावर केली. वाचा सविस्तर
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण, २५ जूनला पंढरपूरकडे होणार प्रस्थान
पुणे - आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे २५ जूनला पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या २ महिन्यापासून पालखी सोहळ्याची तयारी सुरू होती. सोहळ्यातील नियोजनामुळे आळंदी ते पंढरपूर दरम्यानच्या प्रवासात एक आगळवेगळ वैभव पाहायला मिळते. वाचा सविस्तर
CW SA VS PAK : आफ्रिका विश्वकरंडकातून 'आऊट', पाकिस्तानकडू ४९ धावांनी पराभूत
लंडन - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आज पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला ४९ धावांनी पराभूत केले आहे. पाकिस्तानच्या ३०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाने ५० षटकामध्ये ९ गड्यांच्या मोबदल्यात २५९ धावा केल्या. वाचा सविस्तर