ETV Bharat / state

आज...आत्ता...सकाळी ९ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर...

author img

By

Published : May 31, 2019, 9:24 AM IST

मणिपूरमध्ये काँग्रेसच्या १२ आमदारांचा राजीनामा; भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. ईव्हीएमवरचं भूत काही केल्या उतरेना! अनेक सामाजिक संघटना आझाद मैदानात. आता पाण्यासाठी लागणार रेशन कार्ड, कलह टाळण्यासाठी बुलडाण्यात प्रशासनाचा निर्णय. धक्कादायक ! मुंबईत 'ई हुक्का पेन'चा विद्यार्थ्यांना विळखा. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, केळी उत्पादक शेतकऱ्यांना जोरदार फटका.

आज...आत्ता...सकाळी ९ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर...

मणिपूरमध्ये काँग्रेसच्या १२ आमदारांचा राजीनामा; भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा

इंफाळ - लोकसभा निवडणुकीनंतर ईशान्येकडील राज्यांत काँग्रेस पक्षाला भगदाड पडत आहे. मणिपूरमध्ये काँग्रेसच्या १२ आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. वाचा सविस्तर :

ईव्हीएमवरचं भूत काही केल्या उतरेना! अनेक सामाजिक संघटना आझाद मैदानात

मुंबई - निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन हॅक केल्या जाऊ शकतात. ईव्हीएम मशीनवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या जाव्यात, यासाठी आझाद मैदानात आंदोलन करण्यात आल्याची माहिती माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी दिली. वाचा सविस्तर :

आता पाण्यासाठी लागणार रेशन कार्ड, कलह टाळण्यासाठी बुलडाण्यात प्रशासनाचा निर्णय

बुलडाणा - शेगाव तालुक्यातील चिंचोली येथे भीषण पाणी टंचाई आहे. या गावातील नागरिक टँकरवरून एक हंडा पाण्यासाठी जीव धोक्यात घालीत होते. ही भीषण पाणी टंचाई इटीव्ही भारतने समोर आणली होते. प्रशासनाने पाण्यासाठी होत असलेली भांडणं आणि संघर्ष पाहता गावकऱ्यांनी आता कार्डवर पाणी वितरणाचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वाचा सविस्तर :

धक्कादायक ! मुंबईत 'ई हुक्का पेन'चा विद्यार्थ्यांना विळखा

मुंबई - जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून 31 मे जगभरात साजरा केला जातो. तंबाखू सेवनापासून रोखण्यासाठी शासनाकडून विविध संघटनांकडून जनजागृती देखील केली जाते. मात्र तरीही तंबाखू सेवनाचे वाढत चालले आहे. आता तर मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये ई हुक्का पेन ओढण्याचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वाचा सविस्तर :

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, केळी उत्पादक शेतकऱ्यांना जोरदार फटका

जळगाव - जिल्ह्यातील रावेर तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. वादळाचा जोर जास्त असल्याने अनेक गावांमध्ये घरांवरील पत्रे उडाले आहेत. तर काही ठिकाणी मातीच्या कच्च्या घरांची पडझड देखील झाली आहे. वाचा सविस्तर :

Intro:Body:

priya

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.