ETV Bharat / state

Top १० @ ९ AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर... - टॉप टेन न्यूज

सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या राज्य, देशातील ठळक महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर...

author img

By

Published : Jun 19, 2020, 9:16 AM IST

पुणे - शहरातील सुखसागर नगर परिसरात राहणाऱ्या दाम्पत्याने आपल्या दोन लहान मुलांना गळफास देऊन स्वतःही आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आला आहे. अतुल दत्तात्रय शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 30) , ॠवेद अतुल शिंदे (वय6) आणि अंतरा अतुल शिंदे (वय 3) अशी मृत्यांची नावे आहेत. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

वाचा सविस्तर -धक्कादायक..! पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या? मृतांमध्ये २ चिमुकल्यांचा समावेश

नवी दिल्ली - भारतासाठी एक दिलासादायक बाब म्हणजे इतर जगभरातील देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोनाबाधितांचा मृत्यू दर कमी आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. देशभरात गुरुवारी एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3,66,946 वर पोहोचला असून मृत्यूचा आकडा 12,227 झाला आहे.

वाचा सविस्तर - देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी... वाचा एका क्लिकवर

अमरावती - लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून मेळघाटातील पर्यटन स्थळे बंद होती. मात्र, आता मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणारी सर्व पर्यटन स्थळे पर्यंटकांसाठी आजपासून(शुक्रवार) खुली करण्यात येणार आहेत. यात फक्त जंगल सफारी आणि इतर सुविधाच सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक यांनी गुरुवारी आदेश जारी केले आहेत. त्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वाचा सविस्तर - मेळघाट व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला.. एकाच दिवसात करावे लागणार पर्यटन

हैदराबाद - चीनची अर्थव्यवस्था ढासळलेली असून त्यांना युद्ध परवडणारे नाही, असे मत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ कमर आघा यांनी व्यक्त केले आहे. चीनची अर्थव्यवस्था व्यापारावर अवलंबून असून कोरोना विषाणूच्या प्रसारानंतर निर्यात कमी झाली असल्याचे आघा म्हणाले.

वाचा सविस्तर - चीनची अर्थव्यवस्था खराब स्थितीत, त्यांना युद्ध परवडणारं नाही'

मुंबई- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या डॉक्टर, परिचारिका यांच्यासह महापालिकेच्या १७८७ अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७० जणांचा मृत्यू झाला असून १०५० कामगारांनी कोरोनावर मात केली आहे. तर ७३७ कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर काही क्वारंटाईन असल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

वाचा सविस्तर - मुंबई महापालिकेचे १७८७ कर्मचारी कोरोनाबाधित... ७० जणांचा मृत्यू

चंद्रपूर- शेतात राबणाऱ्या मालकाकडे जाणाऱ्या विषारी नागावर 'झिबली' नावाची कुत्री तुटून पडली. शेवटच्या श्वासापर्यंत तिने धाडसी झुंज दिली. यादरम्यान तिला नागाने अनेकदा दंश केला. मात्र, नागाचा फडशा पाडूनच तिने अखेरचा श्वास घेतला. झिबलीच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वाचा सविस्तर - मालकाचा जीव वाचविण्यासाठी 'झिबली'ची नागाशी झुंज; सापाला मारुनच सोडले प्राण

मुंबई - आगामी काळात गतवर्षीप्रमाणे कोल्हापूर, सांगली या भागात पूरस्थिती निर्माण होऊ नये. यासाठी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांसमवेत तातडीने मुख्यमंत्रीस्तरिय बैठक घ्यावी. यात पाण्याचा विसर्ग कसा असावा, याबाबत संयुक्त करार करण्याबाबत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून केली आहे.

वाचा सविस्तर - जर 'हा' धोका टाळायचा असेल तर... फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावती - मान्सून पावसाने महाराष्ट्र व्यापला असून जिल्ह्यातही पावसाचे दमदार आगमन झाले आहे. आज (शुक्रवार) पहाटेपासून शहर आणि लगतच्या परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. या संततधार पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होण्यास मदत होणार असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

वाचा सविस्तर - अमरावती जिल्ह्यात पावसाची रिपरिप; शेतकरी वर्गातून समाधान

वसई (पालघर) - गुरुवारी ८४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ८४५ झाली आहे. तर उपचारादरम्यान ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, त्याच वेळी दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात १२० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत एकूण ७२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. क्षेत्रात आतापर्यंत १०७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित ६९९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचा सविस्तर - वसई-विरारमध्ये गुरुवारी आढळले कोरोनाचे 84 नवे रुग्ण; उपचारादरम्यान 5 रुग्णांचा मृत्यू

मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळून येत असताना, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता 30 दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता 2.30 टक्क्यांवर पोहोचला आहे. दहिसर येथील आर नॉर्थ विभागात रुग्ण वाढीचा दर 13 दिवस तर बोरिवली येथील आर सेंट्रल विभागात रुग्ण वाढीचा दर 16 दिवस इतका आहे. या विभागात रुग्ण वाढ अधिक गतीने होत असल्याची आकडेवारी पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केली आहे.

वाचा सविस्तर -मुंबईमधील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.