आमचं ठरलयं! सगळं समसमान, उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांसमोर सूचक वक्तव्य
मुंबई - आमचं ठरलं असून सगळे समसमान असल्याचे सूचक वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केले. शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिवसेनेनेसुद्धा मुख्यमंत्री पदावर दावा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तसेच मैदान साफ झाले आहे. पण, तंगड्यात तंगड्या घालण्याचा धोका अधिक असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. वाचा सविस्तर
पुण्यात स्टॅम्प घोटाळा : एकाच कुटुंबातील तिघे गजाआड, 68 लाखाचे स्टॅम्प हस्तगत
पुणे - पोलिसांनी शनिवार वाड्याजवळील लाल महालासमोर असलेल्या कमला कोर्ट या इमारतीमधून तब्बल 68 लाख 38 हजार 170 रुपये किंमतीचे 100 आणि 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर जप्त केले आहेत. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. चिन्मय सुहास देशपांडे (26), सुहास मोरेश्वर देशपांडे (59) आणि सुचेता सुहास देशपांडे (54, तिघे रा. 183, कसबा पेठ, पारसनीस वाडा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विजय विश्वनाथ जाधव यांनी फिर्याद दिली आहे. वाचा सविस्तर
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळली शेकडो आधारकार्ड; मुंब्रा देवारीपाडा येथील घटना
ठाणे - मुंब्रा कौसा परिसरातील देवारीपाडा येथील हसरा शाळेच्या पाठीमागील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शेकडो आधारकार्ड आढळल्याने एकच खळबळ उडाली. हे आधारकार्ड बेवारस असल्याने हे बनावट बनविल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. किंवा पोस्टमनने लोकांची आलेली आधारकार्ड वितरित न केल्याने ती नष्ट करण्याच्या उद्देशाने कचऱ्यात फेकल्याची चर्चा सुरु आहे. वाचा सविस्तर
धक्कादायक, रुग्णाच्या जेवणात आढळले जनावराचे शेण; नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील जीवघेणा प्रकार
नागपूर - मुख्यमंत्र्यांच्या शहरामधील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक प्रकार सामोर आला आहे. रुग्णाच्या जेवणात चक्क शेण आढळल्याने प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याआधी देखील याच रुग्णालयात एका महिलेची उघड्यावर प्रसुती झाल्याने संताप व्यक्त केला जात होता. वाचा सविस्तर
ओ पाजी..सनी देओल यांची खासदारकी धोक्यात? 'या' कारणाने निवडणूक आयोगाची नोटीस
चंदीगड - पंजाबच्या गुरुदासपूर येथून भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकलेले अभिनेता-राजकारणी सनी देओल यांची खासदारकी धोक्यात आली आहे. प्रचारादरम्यान मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे. वाचा सविस्तर