ETV Bharat / state

Breaking - काबूल विमानतळाबाहेर स्फोट, आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची स्थानिक माध्यमांची माहिती

author img

By

Published : Aug 26, 2021, 9:39 AM IST

Updated : Aug 26, 2021, 8:36 PM IST

Breaking
Breaking

20:14 August 26

Breaking - काबूल विमानतळाबाहेर स्फोट, आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची स्थानिक माध्यमांची माहिती

काबूल - काबूल विमानतळाबाहेर स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची स्थानिक माध्यमांनी माहिती दिली आहे. तसेच, आणखीही मोठ्या प्रमाणात मृत्यू असतील असा अंदाज या माध्यमांनी वर्तवला आहे. दरम्यान, काबूलमध्ये ही स्फोटांची मालिका चालूच आहे. त्यामुळे लोकांच्या जिवाला धोका वाढला आहे.

19:02 August 26

राज्यपालांनी ठाकरे सरकारला भेट नाकारली, सरकार-राज्यपाल वाद चिघळणार?

मुंबई - राज्यपालांनी ठाकरे सरकारला भेट नाकारली आहे. यामुळे आता सरकाचा आणि राज्यपालांचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अगोदरच विधानपरिषदेच्या १२ आमदारांचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे राज्यपाल आणि सरकार असा एक वाद आहे. आता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात राज्यपालांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, राज्यपालांनी यांना भेट नाकारली आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

18:47 August 26

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्शभूमीवर 1200 डॉक्टर भरणार -राजेश टोपे

मुंबई - तिसऱ्या लाटेच्या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये केरळमध्ये कोरोनाची संख्या वाढली आहे. परंतु, काही सणांना गर्दी झाल्याने हा आकडा वाडला आहे. केरळच्या आरोग्य मंत्र्यांशी मी बोललो आहे अशी माहितीही टोपे यांनी यावेळी दिली आहे. हे रुग्ण वाढण्याचे दोन कारण आहेत. त्यामध्ये एक ओनम हा सण आणि दुसरे कारण टेस्ट वाढवल्या आहेत अशी माहिती केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक बाधित होतील असे मत केंद्राने वर्तवले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण आरोग्य विभागातील 100 टक्के रिक्त जागा भरणार असल्याची माहिती टोपे यांनी यावेळी दिली आहे. यामध्ये क, ड या वर्गातील जागाही असतील. तसेच, 1200 डॉक्टर भरणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

ऑक्सीजन प्लान्ट वाढवतोय  

ऑक्सीजन प्लांटसाठी आम्ही आर्थिक  तरतूद केली आहे. तसेच, आवश्यक सुविधांची सोय केली जात आहे. 1000 रुग्णवाहिका घेणार आहोत, 500 मिळाल्या आहेत, तर लवकरच उर्वरीत येणार आहेत असही ते म्हणाले आहेत. यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला रुग्णवाहिका देणार आहोत. पहिल्या लाटेत 20 लाख, 2ऱ्या लाटेत 40 आणि 3ऱ्या लाटेत 60 लाख रुग्ण सापडतील असा अंदाज केंद्राने वर्तवला आहे. दरम्यान, राज्य सरकारने आशा वर्करला 1500 रुपेश वाढ तर, गट प्रमुख 3600 रुपये वाढ करण्यात आली आहे. ती जुलैपासून लागू होईल. मुलांना बाधा होत नाही, अस नाही 8 ते 10 टक्के मुलांना बाधा झाली झाली आहे. परंतु सुदैवाने मृत्यूच प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये, सर्व उपचार केले जातील असही टोपे म्हणाले आहेत. 

1 कोटी 70 लाख सप्टेंबर मध्ये डोस मिळतील  

सुमारे 1 कोटी 70 लाख लसीचे डोस सप्टेंबरमध्ये मिळतील. त्यामध्य, ग्रामीण भागात 2 ऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येईल. सध्या लोकसंख्यानुसार डोस देतो आहोत. सध्या कोविडवर मात करण्यासाठी लसीकरणाचा रामबाण उपाय आहे.  महाराष्ट्राला 100 टक्के लसीकरणाची गरज आहे.  यामध्ये 52 टक्के लोकांना लस मिळाली आहे. उर्वरित 48 टक्के लोकांनाही लवकरच मिळेल असही टोपे म्हणाले. दरम्यान, सरकारने एकही कोरोनाचा मृत्यू लपवलेला नाही.  खासगी हॉस्पिटलमध्ये झालेल्या रुग्णाची माहिती उशिरा मिळत आहे. मात्र, त्यामध्ये काहीही लपवलेले नाही अशी माहितीही टोपे यांनी यावेळी दिली आहे.

18:42 August 26

Breaking - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री राज्यपालांच्या भेटीला

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. यामध्ये विधान परिषदेच्या 12 आमदारांबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच राज्यातील इतर महत्वाच्या प्रश्नावर चर्चा होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. 

17:06 August 26

शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याची तयारी केली होती -सदाभाऊ खोत

नाशिक - शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याची तयारी केली होती असा गौप्यस्फोट भाजपचे नेते सदाभाऊ खोत यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. आपण भाषणामध्ये अनेक नेत्यांची वेगवेगळे वक्तव्य पाहिले आहेत. मात्र, वक्तव्यावरून इतक्या मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरलेले कधी पाहिले नव्हते असही खोत म्हणाले आहेत. तसेच, हा सर्व गोंधळ सरकार पुरस्कृत असल्याचा आरोपही खोत यांनी यावेळी केला आहे. सध्या राज्यातील जनतेचे प्रश्न सोडून इतर प्रश्न तयार करण्याचे काम सुरू आहे. या सगळ्या प्रकरणापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी बाजूला आहेत. असा प्रश्नही खोत यांनी यावेळी उपस्थित केला आहे. भाजप-सेना एकत्र येऊ नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रयत्न करत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.

टोमॅटो चे दर मोठ्या प्रमाणात घसरण 

सध्या टोमॅटो उत्पादनात लागवडीच्यावेळी केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील शेतकरी डगमगले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवले नाहीतर मोठा उद्रेक होईल, अशी भीती खोत यांनी व्यक्त केली आहे. टोमॅटोचे दर 1 रुपये किलोपर्यंत आलेला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी अशी मागणीही खोत यांनी यावेळी केली आहे.

17:03 August 26

मी स्वत: अडचणीत आहे -प्रताप सरनाईक

मी स्वत: अडचणीत आहे, मंत्र्यांच्या अडचणींचे काय असे वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते ठाण्यात कार्यक्रमात बोलत होते. अनिल परब यांच्या क्लिप बाबत प्रश्न विचारला असता प्रताप सरनाईक यांनी हे वक्तव्य केले आहे. दरम्यान, नारायण राणे यांच्यावर बोलण्या इतपत मी मोठा नाहीये. पण हल्लीच्या नेत्यांनी शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण यांचे आदर्श घ्यावेत अस सरनाईक यावेळी म्हणाले आहेत. काल शिवसैनिकांनी दाखवून दिले ते उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काहीही बोलले तरी खपवून घेणार नाहीत, तसेच शिवसैनिक मुळातच आक्रमक आहेत असही सरनाईक म्हणाले आहेत.

17:01 August 26

सेंट जोसेफ अनाथ आश्रमातील 22 मुले कोरोना कोरोनाबाधित

मुंबई - आग्री पाड्यातील सेंट जोसेफ अनाथ आश्रमातील 22 मुले कोरोना पोजिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. 12 वर्षाखालील 4 मुलांना नायर रुग्णालयाच्या पेडियाट्रिक वॉर्डमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर, 12 वर्षांवरील मुलांना रिचर्डसन अँड क्रूडस येथे कोरोना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनाथाश्रमात कोरोना रुग्ण आढळत असताना, तिथे कॅम्प घेण्यात आला. त्यामध्ये 95 लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या. त्यातील 22 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

16:07 August 26

कोथरूड परिसरात फायरिंग, सापडली जीवंत काडतुसे

पुणे - पुण्यातील कोथरूड डेपो परिसरात असलेल्या मेट्रो कारशेड भागात फायरिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका कर्मचाऱ्याला गोळी लागल्याने किरकोळ जखमी आहे. तर, या ठिकाणी काही जीवंत काडतुसे देखील सापडली आहेत. कोथरुड परिसरात असलेल्या मेट्रोच्या या कारशेडमध्ये काम सुरू आहे. अनेक कामगार त्याठिकाणी काम करत असतात. काल काम सुरू असताना सायंकाळच्या सुमारास अचानक बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आला. त्यावेळी एक गोळी येथील कर्मचाऱ्याच्या पायाला देखील चाटून गेली. यामध्ये हा कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. या ठिकाणी फायरिंग कुणी केली, बंदुकीच्या गोळ्या नेमक्या कुठून आल्या. याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.

13:47 August 26

भरत जैन हत्या प्रकरणातील चार आरोपींना घेतले ताब्यात, ठाणे पोलिसांची कारवाई

ठाणे - भरत जैन हत्या प्रकरणातील चार आरोपींना पकडण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. ज्वेलर्समध्ये दरोडा टाकण्याचा उद्देशानेच त्यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. मारेकऱ्यांपैकी एक ओळखीचा असल्याने आपले बिंग फुटू नये म्हणून मारेकऱ्यांनी जैन यांची गाडीत हत्याच हत्या केली. दरम्यान, हत्या केल्यानंतर जैन यांना कळवा खाडीत टाकून देण्यात आले असल्याची आरोपींनी यावेळी कबुली दिली आहे. तसेच, आरोपींकडून ज्वेलर्समधील मुद्देमाल जप्त, उत्तरप्रदेश, वाराणसीमधून आरोपींना अटक केले आहे.

13:30 August 26

मुंबईत डीसीपीसह तीन पोलीस अधिकाऱ्यांवर १७ लाखांच्या वसुलीचा गुन्हा दाखल

मुंबई - मुंबईच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांनी एका प्राॅपर्टी डिलरकडून १७ लाख रुपये उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. संबंधीत प्राॅपर्टी डिलरने अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. फसवणूक आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या खबऱ्यांमार्फत तब्बल १७ लाख रुपये उकळले असल्याची या प्राॅपर्टी डिलरची तक्रार आहे. या प्रकरणात एक पोलीस उपायुक्त व दोन पोलीस निरिक्षकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

दाखल झालेल्या फिर्यादीनुसार संबंधित तक्रारदाराने पैसे न दिल्याने त्याला एका गुन्ह्यात गोवत एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा गुन्हे शाखा १० कडे वर्ग करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी संबंधित तक्रारदाराला मारहाण करुन त्याच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या. या प्रकरणात दिलेल्या तक्रारीत नोंद केलेल्या डीसीपीसह दोन पोलीस निरिक्षकांचा उल्लेख आहे. त्यापैकी एक पोलीस निरिक्षक अँटीलिया केसमधे अटकेत असून त्याला यापूर्वी खात्यातून बडतर्फ केले आहे.

13:02 August 26

वेगळ्या विदर्भासाठी रास्ता रोको, जेलभरो आंदोलन

नागपूर - वेगळा विदर्भ यासाठी आज विदर्भात सर्वत्र रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज गणेशपेठ बस स्थानकासमोर घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी काही जण बस अडवण्यासाठी गेले. तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अक्षरशः पोलिसांनी एका एकाला उचलून नेले. यावेळी दोन महिल्या पदाधिकारी यांनी रस्त्यावर लोळण घेत आंदोलन सुरू ठेवले. पोलिसांनी त्या महिलांना ताब्यात घेतले. वेगळा विदर्भ, कोरोना काळातील वीज बिल माफी यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

12:20 August 26

राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश कार्यालयात बैठक सुरू

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश कार्यालयात बैठक सुरू,

संघटनात्मक बैठक असल्याची माहिती,

उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आदी नेते यावेळी उपस्थित

12:13 August 26

अनिल देशमुखांप्रकरणी सीबीआयचा राज्य सरकारवर असहकाराचा आरोप, 2 सप्टेंबरला कागदपत्रे सोपवणार

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. याप्रकरणी राज्य सरकारवर सहकार्य करत नाही, असा आरोप सीबीआयने उच्च न्यायालयात केला होता. त्याप्रकरणी सीबीआय 2 सप्टेंबर रोजी राज्य सरकारकडे कागदपत्रे सोपवणार असल्याचे समजते आहे.

12:11 August 26

शिवसेना विभाग प्रमुख अमित जैस्वाल यांच्यावर प्राणघातक हल्ला

मुंबई - शिवसेना विभाग प्रमुख अमित जैस्वाल यांच्यावर प्राणघातक हल्ला, अज्ञात हल्लेखोरांनी शिवसेना शाखेतच केला हल्ला

11:57 August 26

संजय राऊत भुवनेश्वरचा दौरा सोडून मुंबईत दाखल, राजकीय घडामोडींना वेग

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. कारण, शिवसेना खासदार संजय राऊत हे भुवनेश्वरचा दौरा सोडून मुंबईत दाखल झाले आहेत.

11:09 August 26

औरंगाबादमध्ये इन्कम टॅक्स विभागाचा धाक दाखवून उद्योजकाकडे 60 लाखांची मागणी

औरंगाबाद : उद्योजकाला इन्कम टॅक्स विभागाचा धाक दाखवून मागितली 60 लाखांची खंडणी,

उद्योजकाची पोलीस ठाण्यात धाव,

पोलिसांकडून अद्यापही गुन्हा दाखल नाही,

खंडणी मागतानाची घटना कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ आला समोर

10:54 August 26

भारतात 46, 164 नव्या कोरोना रुग्णांची भर, 607 मृत्यू

भारतात गेल्या 24 तासात 46, 164 नवीन कोरोना रुग्ण आढळले.  34,159  रुग्ण बरे झाले. 607 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे भारतातील एकूण रुग्णसंख्या 3,25,58,530 इतकी झाली आहे. आतापर्यंत एकूण 3,17,88,440 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 3,33,725  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 436365 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत एकूण 60,38,46,475 (80,40,407) जणांचे भारतात लसीकरण झाले आहे.

10:31 August 26

मुंबईत ड्रग्ज तस्कराला अटक, 10 लाखांचे चरस जप्त

मुंबई - मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या आझाद मैदान युनिटने गोरेगाव परिसरातून ड्रग्ज तस्करांना अटक केली. तस्करांकडून 504 ग्रॅम चरस जप्त केला आहे. जप्त केलेल्या चरसची किंमत 10 लाखा रुपयांपेक्षा जास्त आहे. आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. अशरफ अजगर सय्यद असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला अधिक तपासासाठी दिंडोसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

09:23 August 26

Breaking - अचानक रेल्वे रुळ तुटला, चालकाच्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळली

कर्जत - केळवली स्थानकाजवळ अचानक रेल्वे रुळ तुटल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने सावधगीरीने रेल्वे थांबवत याची सर्व कल्पना रेल्वे विभागाला दिली. तत्काळ रुळ दुरुस्ती काम करून रेल्वे सेवा पुर्ववत सुरु करण्यात आली. दरम्यान, कर्जतहून खोपोलीच्या दिशेने 8 वाजून 15 मिनिटांची जाणारी ही रेल्वे होती. यावेळी 12 ते 15 मिनिट रेल्वे सेवा ठप्प झाली. अनेक प्रवाशांची सकाळी कामाला जाताना व्यवस्थापन करण्यात तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. तर चालकाच्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने अनेकांनी चालकांच्या कामाचे कौतुक केले.

Last Updated : Aug 26, 2021, 8:36 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.