नांदगाव स्थानकाजवळ 'हॉलिडे' एक्स्प्रेसचे चाक तुटले; मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प
नाशिक - बरेलीहून मुंबईकडे निघालेल्या गाडी क्रमांक 02062 या हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी डब्याचे चाक तुटल्याने गाडी रुळावरून घसरली. ही घटना आज सकाळी नांदगांव रेल्वे स्थानकाजवळ घडली. दरम्यान गाडीचा वेग कमी असल्याने, मोठा अपघात टळला. मात्र, या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वाचा सविस्तर...
मुस्लिमांना त्यांचा हिस्सा १९४७ सालीच दिलाय, भाजपचा ओवेसींच्या वक्तव्यावर पलटवार
मुंबई - असदुद्दीन ओवेसी यांनी विचार करून बोलावे. देशात मुस्लिमांना कोणीही भाडेकरू असल्याचे म्हटलेले नाही. तरीही मुस्लिमांना ते देशातील हिस्सेदार आहेत असे वाटत असेल तर, त्यांचा हिस्सा त्यांना १९४७ सालीच देण्यात आला आहे. त्यामुळे तो विषय तिथेच संपला, असे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर...
चंद्रपूरमध्ये घरात झोपलेल्या ९ महिन्याच्या चिमुरड्याला बिबट्याने नेले ओढून, हल्ल्यात बाळाचा मृत्यू
चंद्रपूर - सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात घरात झोपलेल्या तान्हुल्याल्या बिबट्याने पळवल्याची घटना घडली. या हल्ल्यात ९ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. वाचा सविस्तर...
ज्यांना मित्रपक्षांसोबत राहू नये असं वाटतं त्यांनीच 'ही' अफवा पसरवली - शरद पवार
मुंबई - पक्ष विलीनीकरणाची बातमी ही अफवा होती. ज्यांना वाटतं की आपण मित्रांसोबत एकत्र राहू नये अशांनी, काही पत्रकारांना सोबत घेऊन ही बातमी मुद्दाम पसरवली. ही बातमी साफ खोटी आहे. राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व कायम राहील, असे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर...
अर्ध्यात आल्यावर घागर सोडून द्यावी वाटते; 'आदर्श सांसद ग्राम' गावातील महिलेची व्यथा
सोलापूर - पाणी शेंदताना घागर अर्ध्यात आल्यावर सोडून द्यावी वाटते ही व्यथा मांडली आहे आदर्श सांसद ग्राम असलेल्या माढा तालुक्यातील तुळशी या गावातील एका महिलेने. मागील ८ महिन्यापासून पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसणाऱ्या या गावातील महिलांच्या व्यथा ऐकल्या तर, मन सुन्न होऊन जाते इतकी वाईट अवस्था या गावामध्ये झाली आहे. पाहुयात ईटीव्ही भारतचा विशेष वृत्तांत. वाचा सविस्तर...