ETV Bharat / state

आज...आत्ता... ( शुक्रवार ३१ मे २०१९) दुपारी २ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर - Video

नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहिर...अमित शहा, राजनाथ सिंह, गडकरींना मिळाली 'ही' खाती. कोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवून बँकेवर दरोडा; ६२ हजाराचा मुद्देमाल पळवला. व्हिडिओ : नाशकात महिलेचा दुर्गावतार; चाकूधारी चोरट्याला शिकवला धडा. औरंगाबादेत सिनेस्टाईलने पाठलाग करून युवकावर तलवारीने हल्ला. पुण्यात पाईपलाईन फुटून तब्बल १० तास पाण्याची नासाडी

आज...आत्ता... ( शुक्रवार ३१ मे २०१९) दुपारी २ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर
author img

By

Published : May 31, 2019, 2:03 PM IST

नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहिर...अमित शहा, राजनाथ सिंह, गडकरींना मिळाली 'ही' खाती

नवी दिल्ली - केद्रीय मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. अपेक्षेप्रमाणे अमित शाह यांच्याकडे गृहमंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर राजनाथ सिंह यांच्याकडे गृहमंत्रीपदाऐवजी संरक्षण मंत्रीपदाची जबादारी देण्यात आली आहे. मोदी सरकारच्या पहिल्या पर्वातील संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला आहे. नितिन गडकरी यांच्याकडे दळवणळण मंत्रालय कायम ठेवण्यात आले आहे. तर कृषीमंत्रालयाचा पदभार नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. वाचा सविस्तर...

कोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवून बँकेवर दरोडा; ६२ हजाराचा मुद्देमाल पळवला

कोल्हापूर - आपटेनगर भागातील यशवंत सहकारी बँकेवर भरदिवसा दरोडा पडल्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून बँकेतून ६२ हजारांची रोकड पळवली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वाचा सविस्तर...

व्हिडिओ : नाशकात महिलेचा दुर्गावतार; चाकूधारी चोरट्याला शिकवला धडा

नाशिक - सातपूर परिसरातील अशोकनगर भागात राहणाऱ्या सविता मुर्तडक यांनी एका चोराला चोरी करण्यास प्रतिकार करत पळवून लावले. चोराच्या हातात चाकू असतानासुद्धा सविताने दुर्गावतार धारण करत ताकदीने त्याचा सामना केला. हा सर्व प्रकार सविता यांच्या दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनीदेखील या महिलेच्या धाडसाचे कौतूक केले. तसेच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सविता यांचा सत्कार देखील केला आहे. वाचा सविस्तर...

औरंगाबादेत सिनेस्टाईलने पाठलाग करून युवकावर तलवारीने हल्ला

औरंगाबाद - शहरातील सिल्लेखाना चौकात हल्लेखोरांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून युवकावर धारदार तलावरीने वार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात ३ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे. वाचा सविस्तर...

पुण्यात पाईपलाईन फुटून तब्बल १० तास पाण्याची नासाडी

पुणे - शहरातील विमाननगर परिसरात दत्तमंदिराजवळ महापालिकेची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. तब्बल १० तास पाणी वाहत असल्याचे सांगितले जात आहे. वाचा सविस्तर...

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.