मुंबई - बेस्टच्या ताफ्यात मिनी नंतर मोठ्या इलेक्ट्रिक बसेस आणण्यात आल्या आहेत. या इलेक्ट्रिक बसचे व माहीम बस स्थानकाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
बेस्टच्या ताफ्यात नव्या 175 इलेक्ट्रिक बस -
बेस्टने पर्यावरण रक्षणासाठी आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ओलेक्ट्रा या कंपनीकडून काही इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर टाटा कंपनीकडून बसेस भाडेतत्वावर घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. टाटाकडून 175 मिनी व आता नव्याने 175 मोठ्या इलेक्ट्रिक गाड्या बेस्टच्या ताफ्यात आल्या आहेत. यामुळे बेस्टच्या ताफा 4 हजार बसचा झाला असून त्यात सुमारे 400 बस या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या आहेत. या बस चार्जिंग करण्यासाठी शिवाजी नगर, मालवणी आणि बॅक बे डेपो येथे चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
माहीम बस डेपोचे नूतनीकरण -
माहीम बस डेपोचे नूतनीकरण करण्यात आले आहे. विकासकाने विकसित केलेल्या या बस डेपोमध्ये खाली बस डेपो असून वरील मजल्यावर व्यावसायिक गाळे काढण्यात आले आहेत.
हेही वाचा - राज कुंद्राची अटक योग्यच; मुंबई उच्च न्यायालयानं याचिका फेटाळली