ETV Bharat / state

'सेव्ह आरे' चळवळीला मोठे यश मात्र, लढा सुरूच ठेवण्याची पर्यावरणप्रेमींची भूमिका

author img

By

Published : Sep 3, 2020, 7:17 PM IST

'सेव्ह आरे' चळवळीला मोठे यश मिळाले आहे. आरेतील 600 एकर जागा वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर सेव्ह आरेचे कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि आदिवासी आनंदी आहेत.

Aarey Forest
आरे जंगल

मुंबई - राजधानी मुंबईचे फुफ्फुस अशी ओळख असलेल्या आरे जंगलाचा विकासाच्या नावाखाली नाश करण्याचा डाव आखण्यात आल्याचे म्हणत पर्यावरणप्रेमींनी 'सेव्ह आरे' चळवळ सुरू केली. आज या चळवळीला मोठे यश मिळाले आहे. आरेतील 600 एकर जागा वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर सेव्ह आरेचे कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि आदिवासी आनंदी आहेत. मात्र, जोपर्यंत आरेचे संपूर्ण 3 हजार एकरचे क्षेत्र संरक्षित म्हणून घोषित होत नाही तोपर्यंत 'सेव्ह आरे'चा लढा सुरूच राहील, अशी भूमिका आता सेव्ह आरे ग्रुपने घेतली आहे.

लढा सुरूच ठेवण्याची पर्यावरण प्रेमींची भूमिका

मुंबईत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. या विकासासाठी झाडे, उद्यान, मोकळ्या जागांचा ऱ्हास करण्यात आला. आता मुंबईत तितक्याशा मोकळ्या जागा नसल्याने सरकारी यंत्रणांनी आपला मोर्चा आरेकडे वळवला आहे. आरेतील मोकळ्या जागेवर बिल्डरांचाही डोळा आहे. सध्या मुंबईत हे एकमेव जंगल असून हे जर नष्ट झाले तर मुंबईला पुराचा धोका निर्माण होणार आहे. सोबतच पर्यावरणाचे अनेक प्रश्न निर्माण होणार असल्याचे म्हणत मुंबईतील पर्यावरणप्रेमी आणि आदिवासी एकत्र आले. त्यांनी 'सेव्ह आरे' ही चळवळ उभारली. जनजागृती करत त्यांनी चळवळ व्यापक केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील 600 एकर जागा वन म्हणून संरक्षित केली आहे. या निर्णयावर वनशक्ती प्रकल्पाचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी समाधान व्यक्त केले आहे. यासाठी मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्र्यांचे त्यांनी आभारही मानले आहेत. 3 हजार एकरपैकी 600 एकर क्षेत्र वन म्हणून घोषित होणे ही मोठी बाब आहे. आता पुढे उर्वरित जमीनही वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी हे सरकार नक्कीच काही तरी पाऊल उचलेल अशी अपेक्षा आहे. आमचा लढा हा 'सेव्ह आरे'चा आहे. त्यामुळे संपूर्ण आरे संरक्षित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी सरकारच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. आताच्या घडीला जंगल वाचवणे हे पुढच्या पिढीसाठी अत्यंत गरजेचे आहे. असे असतानाही मुंबईतील जंगल नष्ट करण्याचा डाव आखण्यात आला. मात्र, हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही गेली 7 वर्षे आरे हे वन आहे असे जीव तोडून सांगत आहोत. आता सत्य बाहेर आले ही, आनंदाची बाब आहे. पण जोपर्यंत संपूर्ण क्षेत्र वन म्हणून घोषीत होत नाही, तोपर्यंत 'सेव्ह आरे' चळवळ सुरूच राहील, असेही जोशी यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.