ETV Bharat / state

पर्यावरणप्रेमींनी देवेंद्र फडणवीसांना दिले 'हे' चॅलेंज - Aarey case Environmentalists call

फडणवीस यांना आम्ही फोन करत आहोत, त्यांना मॅसेज केला आहे. पण, काहीच उत्तर देत नाही. त्यामुळे, आता आम्ही त्यांना एक पत्र लिहिले असून, ते पोस्टाने त्यांना पाठवणार आहोत. त्यांना मेलही केला आहे. आता ते याला कधी आणि काय उत्तर देतात हे पाहू, बाथेना यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Oct 13, 2020, 6:52 PM IST

मुंबई- कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ प्रकल्पाचे कारशेड आरेतून कांजूरमार्गला हलवण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी आणि सेव्ह आरेचे सदस्य आनंदात आहेत. मात्र, दुसरीकडे त्याचवेळी कांजूरला कारशेड नेल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होणार असून प्रकल्पाला मोठा विलंब होणार असल्याचे म्हणत अनेक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांकडून केले जात आहे. यामुळे पर्यावरणप्रेमी आता आक्रमकही झाले आहेत. त्यातूनच आता पर्यावरणप्रेमींनी फडणवीसांविरोधात दंड थोपटत त्यांना चर्चेसाठी खुले आव्हान दिले आहे.

सार्वजनिक बैठकीच्या माध्यमातून फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांनी आमच्याशी चर्चा करावी. या चर्चेत दूध का दूध, पानी का पानी होईल, आणि सत्य का ते समोर येईल, असे म्हणत पर्यावरण प्रेमींनी फडणवीस यांना पत्र, मेल, फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअ‌ॅप करत चॅलेंज दिले आहे. २०१५ मध्ये एका समितीने मेट्रो-३ चे कारशेड कांजूरमध्ये हलवण्यात यावे, अशी शिफारस केली होती. पण, त्यावेळी मुख्यमंत्री या नात्याने फडणवीस यांनी ही शिफारस फेटाळून लावत, आरेत कारशेड बांधण्याचा निर्णय घेतल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे. मुळात कारशेडवरून, आरेवरून पर्यावरण प्रेमी विरुद्ध भाजपा असा वाद पाहायला मिळत आहे. तर, कांजूरमध्ये कारशेड हलवल्यानंतर हा वाद आणखी पेटला आहे.

कारशेडचा निर्णय जाहीर झाल्याबरोबर फडणवीस यांनी या निर्णयावर टीका केली. तर, यामुळे ४ हजार कोटींचा खर्च वाढेल. आधीचा ४०० कोटीचा खर्च वाया जाईल असेही म्हटले आहे. त्याचवेळी कांजूरची जागा खार जमीन आहे, त्यावर खूप भराव टाकावा लागेल, प्रकल्पाला विलंब होईल, असेही फडणवीस आणि भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. पर्यावरण प्रेमी झोरू बाथेना आणि स्टॅलिन दयानंद यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे. फडणवीस यांनी मीडियासमोर असे आरोप करण्यापेक्षा आमच्याशी खुली चर्चा करावी. पब्लिक मीटिंग घेत मेट्रो ३ आणि कारशेडवर, आरोपांवर चर्चा होईल. त्याला आम्ही उत्तर देऊ. आम्ही चुकत असू तर आम्ही जनतेसमोर उघडे पडू, जर ते चुकत असतील तर तेही सिद्ध होईल. पण त्यासाठी फडणवीस यांनी समोर येण्याची गरज असल्याचे बाथेना यांनी सांगितले.

फडणवीस यांना आम्ही फोन करत आहोत, त्यांना मॅसेज केला आहे. पण, काहीच उत्तर देत नाहीत. त्यामुळे, आता आम्ही त्यांना एक पत्र लिहिले असून, ते पोस्टाने त्यांना पाठवणार आहोत. त्यांना मेलही केला आहे. आता ते याला कधी आणि काय उत्तर देतात हे पाहू, असेही बाथेना यांनी सांगितले.

हेही वाचा- ईटीव्ही स्पेशल : मेट्रो-6 आणि कांजूर कारशेड अडीच वर्षांत होणार पूर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.