ETV Bharat / state

मेट्रो 3 मध्ये आधीच कारशेडचा 'अट्टहास' का, पर्यावरणप्रेमींचा एमएमआरसीला सवाल - मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन बातमी

मेट्रो 6 प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू आहे. पण, अद्याप यासाठी कारशेडची जागाच निश्चित करण्यात आलेली नाही. तेव्हा मेट्रो 3 मध्ये आधीच कारशेडचा अट्टहास का, असा सवाल करत पर्यावरणप्रेमींनी एमएमआरसीला पुन्हा एकदा 'टार्गेट' केले आहे.

कारशेड
कारशेड
author img

By

Published : Sep 10, 2020, 4:48 PM IST

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीपझ मेट्रो 3 मार्गातील आरे कारशेड वादात अडकले आहे. या कारशेडला जोरदार विरोध होत असून आता राज्य सरकारनेही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ला दणका देत कारशेड आरेतून हलवण्याच्यादृष्टीने आदेश दिले आहेत. पण, यावर अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी आहे. अशात पर्यावरणप्रेमी मात्र अजूनही आरे कारशेडच्या मुद्द्यावरून एमएमआरसीवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. मेट्रो 6 प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू आहे. पण, अद्याप यासाठी कारशेडची जागाच निश्चित करण्यात आलेली नाही. तेव्हा मेट्रो 3 मध्ये आधीच कारशेडचा अट्टहास का, असा सवाल करत पर्यावरणप्रेमींनी एमएमआरसीला पुन्हा एकदा 'टार्गेट' केले आहे.

पर्यावरणप्रेमी आणि माहिती अधिकार कार्यकर्ते झोरू बाथेना यांची प्रतिक्रिया

पर्यावरणप्रेमी आणि माहिती अधिकार कार्यकर्ते झोरू बाथेना यांनी मेट्रो 6, लोखंडवाला-जोगेश्वरी-विक्रोळी-कंजूरमार्ग मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) कडे माहिती अधिकाराखाली माहिती मागितली होती. मेट्रो 6 साठी कुठे कारशेड उभारण्यात येणार आहे, याची जागा कुठे आहे असे प्रश्न विचारण्यात आले होते. यावर डीएमआरसीने उत्तर दिले आहे. त्यानुसार अजूनपर्यंत मेट्रो 6 मधील कारशेडसाठी जागा निश्चित झालेलीच नसल्याचे डीएमआरसीने स्पष्ट केल्याचे बाथेना यांनी सांगितले. मेट्रो 3 वगळली तर इतर सर्व मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) उभारत आहे. तर, मेट्रो 6 चे बांधकाम डीएमआरसी कंत्राटदाराच्या रुपाने करत आहे. दरम्यान एमएमआरडीएकडून मेट्रो 7 चे काम वेगात सुरू असून एक-दीड वर्षात मार्ग बांधून पूर्ण होईल. पण, अद्याप या मार्गासाठी एमएमआरडीएला कारशेडची जागा मिळालेली नाही. मात्र, तरीही काम वेगात सुरू आहे.

तर मेट्रो 2 साठी मंडाले येथे जागा आहे, पण ही जागा अजून मिळालेली नाही. असे असताना मेट्रो 2 चेही काम वेगात सुरू आहे. कारण एमएमआरडीएने यावर पर्याय शोधून काढले आहेत. एमएमआरडीएकडून मेट्रो 2 आणि मेट्रो 7 साठी चारकोपमध्ये तात्पुरते कारशेड तयार करण्यात येणार आहे. याच कारशेडचा वापर दोन्ही मार्गासाठी कायमस्वरुपी कारशेड उपलब्ध होईपर्यंत करण्यात येणार आहे. असे असताना आता मेट्रो 6 प्रकल्पातही कारशेडची जागा निश्चित झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तरीही या प्रकल्पाचेही काम सुरू आहे. असे असताना एमएमआरसी मात्र मेट्रो 3 चे काम सुरू होण्याआधीपासून ते आजतागायत कारशेडवरच अडून आहे. कारशेड बांधण्यावरच त्यांचा अधिक भर आहे. त्यामुळे त्यांना पर्यायही शोधायचे नाहीत असा आरोप बाथेना यांनी केला आहे. एमएमआरसी आरेच्याच जागेवर अडून का बसली आहे, हा मोठा प्रश्न आहे. तर आतातरी त्यांनी आरेचा हट्ट सोडत राज्य सरकारच्या निर्देशानुसार इतरत्र कारशेड हलवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा - कंगना हा विषय आमच्यासाठी संपला - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.