ETV Bharat / state

School Entrance Ceremony : शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

दोन वर्ष कोरोना स्थिती मुळे विद्यार्थ्यी शाळेत नियमित येत नव्हते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात 15 जून रोजी तर विदर्भात 27 जून रोजी (the first day of school) शाळा प्रवेशोत्सव ( School Entrance ceremony) साजरा करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी केले आहेत.

Varsha Gaikwad
वर्षा गायकवाड
author img

By

Published : Jun 12, 2022, 4:12 PM IST

मुंबई: इयत्ता पहिली ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करताना ( School Entrance ceremony) शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी (the first day of school) प्रत्येक अधिकाऱ्याने किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रबोधन करावे. फूल देऊन किंवा शालेय उपयोगी साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात यावे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण होण्यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक राहील असे व्यवस्थापन करावे, असे परिपत्रक सर्व संबंधितांना देण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने शैक्षणिक अध्ययन विस्कळीत झाले आहे. शाळांतील शैक्षणिक सोयीसुविधा अस्त-व्यस्त झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी आणि दर्जेदार तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित असल्याने हा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मागील काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक यांच्याशी चर्चा करून अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना, सेतू अभ्यासक्रम, इतर शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमबजावणी करण्याबाबत सहकार्य करावे. तसेच शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ यांचे सहकार्य घेण्यात यावे, असेही याद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : 'खेलो इंडिया युथ गेम्स'मध्ये युवा खेळाडूंना प्रेरित करणार आमिर खान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.