मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पात पुलाच्या बाहेरील बाजूस वाहतूक सुरक्षिततेसाठी ( England After a Successful Trial in South Korea ) संरक्षण कठडा उभारण्यास सुरुवात केली आहे. या कठड्याची एकूण उंची १५५० मिमी म्हणजे सुमारे ५ फूट आहे. या संरक्षण कठड्याच्या खालच्या भागात ९०० मिमी कॉंक्रिटचे बांधकाम असून, त्यावर दक्षिण कोरियातून मागविलेल्या ६५० मिमी उंचीच्या भागात स्टील रेलिंगचे बांधकाम वेगाने सुरू आहे. इंग्लंड, दक्षिण कोरियात यशस्वी चाचणीनंतर मुंबई पारबंदर प्रकल्पावर संरक्षक कठडा उभारण्याचे काम सुरू झाले.
प्रवाशांना समुद्रात पाहताना दिसणार निसर्ग सौंदर्य प्रकल्पामध्ये ५ फूट उंचीची संरक्षणभिंत उभारणे प्रस्तावित होती. पण, त्यामुळे प्रवाशांना समुद्रात पाहताना निसर्ग सौंदर्य दिसण्यात अडथळा निर्माण झाला असता. या सुधारित डिझाईनमुळे समुद्रातील विहंगम दृश्यांचा तसेच फ्लेमिंगो पाहण्याचा आनंद प्रवाशांना घेता येईल. संरक्षण कठडा उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन केले गेले. कोणत्याही प्रकल्पामध्ये या रीतीने बांधकाम करीत असताना आंतरराष्ट्रीय नियम आणि त्याचे निकष याचे पालन करणे प्रत्येकाला सक्तीचे असते. त्यामुळे EN १३१७ या आंतरराष्ट्रीय मानकाचे पालन करीत मुंबई पारबंदर प्रकल्पासाठी गॅल्वनाइज्ड स्टीलच्या रेलिंगचा वापर करण्यात आला असून, याची प्रत्यक्ष चाचणी करण्यात आली आहे.
![England after a successful trial in South Korea The work of erecting a protective wall on the Mumbai Parbandar Project has started](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mhmumenglandafterasuccessfultrialinsouthkoreatheworkoferectingaprotectivewallonthemumbaiparbandarprojecthasstarted7211191_26122022185348_2612f_1672061028_341.jpg)
प्रकल्प वैशिष्ट्य मुंबई पारबंदर प्रकल्प ( Mumbai Trans Harbour Link ) किंवा शिवडी-न्हावा शेवा पारबंदर मार्ग हा मुंबई महानगर क्षेत्रामधील एक प्रस्तावित प्रकल्प आहे. अरबी समुद्राच्या ठाणे खाडीवर २२ किमी लांबीच्या व भारतातील सर्वात मोठ्या पुलाद्वारे दक्षिण मुंबईमधील शिवडी भाग नवी मुंबईसोबत जोडला जाईल. हा मार्ग मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गासोबतदेखील जोडला जाईल, ज्यामुळे पुण्याहून दक्षिण मुंबईकडे वाहतूक सुलभ होईल. तसेच, प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळदेखील दक्षिण मुंबईहून कमी अंतरात गाठता येईल.
![England after a successful trial in South Korea The work of erecting a protective wall on the Mumbai Parbandar Project has started](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mhmumenglandafterasuccessfultrialinsouthkoreatheworkoferectingaprotectivewallonthemumbaiparbandarprojecthasstarted7211191_26122022185348_2612f_1672061028_631.jpg)
संरक्षक कठड्याची नवीन डिझाईन युके आणि दक्षिण कोरियाच्या धर्तीवर संरक्षण कठड्याच्या नवीन डिझाइनची चाचणी यूके आणि दक्षिण कोरियामध्ये यशस्वीरित्या करण्यात आली आहे. सुरक्षिततेबरोबरच, प्रवाशांना समुद्र आणि फ्लेमिंगोच्या दृश्यांचा आनंद घेता येईल अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. आम्ही एका महिन्यात कास्टिंगच्या एकूण लांबीच्या १२ टक्के काम साध्य केले आहे."अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्री एस.व्ही. आर. यांनी दिली.