ETV Bharat / state

Youth Business : तरुणांसमोर आदर्श! इंजिनियर तरुण मुंबईच्या रस्त्यावर विकतोय आप्पे

कोविड काळात बेरोजगार ( Unemployed youth during Corona ) झालेल्या तरुणाने परिस्थितीला न खचता एक आदर्श निर्माण केला आहे. मुंबईतील राहुल कडू या अभियंत्याने नोकरी ( Youth unemployed ) गमावल्यानंतर रस्त्यावर आप्पे विकण्याचा निर्णय घेतला. केवळ तीन हजार रुपये भांडवलात मुंबईच्या रस्त्यावर "इंजिनियर आप्पे" ( Engineer Appe ) या नावाने त्यांने व्यावसायाला सुरवात केली आहे.

author img

By

Published : Dec 4, 2022, 3:41 PM IST

Unemployed
राहुल कडू

मुंबई - कोविड काळात अनेक तरुण बेरोजगार ( Youth unemployed ) झाले. इंजिनीयर, आयटी या क्षेत्रातल हजारोंना कोरोना काळात फटका ( Unemployed youth during Corona ) बसला. मात्र, अशा परिस्थिती काही उच्चशिक्षित तरुणांनी चक्क रस्त्यावर स्टॉल उभे करत आपल्या घराचा गाडा हाकण्याचा प्रयत्न केला. तसेच मुंबईतील एका तरुण अभियंत्याने नोकरी गमावल्यानंतर रस्त्यावर स्टॉल लावून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

इंजिनीयर तरुण मुंबईच्या रस्त्यावर विकतोय आप्पे

मुंबईच्या रस्त्यावर आप्पे विकण्याचा निर्णय - कोविड काळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. खास करून उच्चशिक्षित तरुणांना कोविड काळाचा मोठा फटका बसला. आयटी, इंजिनिअर क्षेत्रात असणाऱ्या अनेक तरुणांच्या या काळामध्ये नोकऱ्या गेल्या. हजारो तरुण या परिस्थितीत हतबल झाले. तर, काहींनी या परिस्थितीत सुवर्णसंधी शोधण्याचा प्रयत्न केला. मुंबईच्या लोअर परेल भागात राहणाऱ्या राहुल कडू या तरुणाने देखील कोविड काळात आपली नोकरी गमावली. बरेच महिने घरात राहिल्यानंतर उपजीविकेसाठी नेमकं करायचं काय हा प्रश्न राहुल समोर उभा होता. व्यवसाय करायला हातात भांडवल नव्हतं. बाहेर कुठेही नोकऱ्या मिळत नव्हत्या अशा कठीण परिस्थितीत राहुलने इंजिनियर असून चक्क मुंबईच्या रस्त्यावर आप्पे विकण्याचा निर्णय घेतला. केवळ तीन हजार रुपये भांडवलात मुंबईच्या रस्त्यावर "इंजिनियर आप्पे" ( Engineer Appe ) या नावाने स्टॉल लाऊन आप्पे विकणे सुरू केलं.

असा सुरू केला आप्पेचा स्टॉल - मुंबईच्या लोअर परेल भागामध्ये अनेक खाजगी कंपन्यांचे कार्यालय आहेत. या कार्यालयात काम करायला येणाऱ्या कामगारांची संख्या देखील तेवढीच मोठी आहे. सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात नाश्ता करण्यासाठी लोक कार्यालयाच्या बाहेर येतात, याची माहिती रोहितला होती. मात्र आधीपासूनच अनेक व्यावसायिक विक्रेते या भागामध्ये आपला व्यवसाय थाटून उभे होते. अशात आपण वेगळं काय करू शकतो असा विचार रोहितच्या मनात आला. कोल्हापूर, सातारा या परिसरामध्ये नाश्त्यासाठी प्रसिद्ध असणारे आप्पे आपण बनवून विकावे असे त्यांने ठरवले. या परिसरात कोल्हापूर सातारा या परिसरात राहणारे नागरिक ही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आपल्याला काहीसा प्रतिसाद मिळेल असं रोहितला व्यवसाय सुरू करण्याच्या आधी वाटलं. मात्र, सुरुवातीचे दोन महिने अत्यंत कठीण होते. दुकानावर आणलेला माल देखील विकला जात नव्हता अशी परिस्थिती होती. मात्र, हळूहळू अप्प्याची चव लोकांच्या जिभेवर रेंगाळायला लागली. या परिसरात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील आप्पे आवडू लागले. आज जवळपास सात ते आठ किलो पिठाचे आप्पे रोहित विकत आहे. आज याच व्यवसायाच्या जोरावर रोहित महिन्याला 60 ते 70 हजार रुपये कमावतो आहे.

व्यवसाय करायला जिद्द हवी - आपण 2014 साली इंजिनिअरिंगची परीक्षा पास केली. त्यानंतर जवळपास सहा वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीही केली. मात्र, हवा तसं यश मिळत नव्हतं. पगारही व्यवस्थित हातात येत नव्हता. त्यातच कोविड काळामध्ये आपली नोकरी गेल्यामुळे आपल्यावर संकट मोठं होतं. अशा संकटाच्या काळात व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला. मात्र व्यवसाय तग धरून राहणं हे अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक वेळा मराठी तरुण व्यवसाय सुरू करूनही यश येत नाही. म्हणून व्यवसाय बंद करतात मात्र, तसं न करता व्यवसाय सुरू केल्यानंतर तो उभा राहण्यासाठी काही काळ देणे गरजेचे आहे असल्याचे मत राहुलने सांगितले. आज काही प्रमाणात आपल्याला व्यवसायाला यश आला आहे. त्यामुळे हाच व्यवसाय आपण पुढे करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आपण लोअर परेल परिसरात रस्त्यावर जरी आप्पे विकत असलो तरी, लवकरच आपण हा सर्व व्यवसाय एका दुकानात शिफ्ट करणार आहोत. तसेच आपल्या आप्प्यांची फ्रेंचाईजी तयार करून मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही राहुल कडू सांगत आहे. लहानपणापासूनच आपल्याला जेवण बनवण्याचे आवड असल्याने आपण आप्पे बनवून विकण्याचा निर्णय घेतला. आपण तयार केलेला एक वेगळी चव आहे. ग्राहकांना देखील आपल्या आप्प्यांची चव आवडली आहे. त्यामुळे आपण पुढील काळात फ्रॅंचाईजी तयार केली तरी ती चव कायम राहावी यासाठी प्रयत्न करणार आहोत असेही राहुल यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.