मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी ( Industrialist Mukesh Ambani ) यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण ( Antilia bomb scare ) आणि मनसुख हिरेन हत्याकांडातील आरोपी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा ( Encounter Specialist Pradeep Sharma Bail Petition ) यांच्या जामीन अर्जावर आज दोन्हीही बाजूंच्या युक्तिवादावर सुनावणी पूर्ण झाली. मात्र न्यायमूर्ती रेवती डेरे मोहिते आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवला आहे. प्रदीप शर्मा ( Encounter Specialist Pradeep Sharma Bail Petition ) यांना जामीन मिळणार, की कारागृहातील मुक्काम वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रदीप शर्मा यांना जामीन देण्यात येऊ नये एनआयएच्या ( NIA ) वतीने अतिरिक्त सोलिसिटर जनरल अॅड. अनिल सिंह ( Solicitor General Adv. Anil Singh ) यांनी 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये वाझे आणि शर्मा ( Sachin Vaze And Pradip Sharma Meet ) यांची भेट झाल्याचे कबूल केल्याचा युक्तीवाद केला. त्यासह कॉल लोकेशनही आम्ही सादर केले, त्याची पुष्टी करण्यासाठी 2 आयविटनेस स्टेटमेंटमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रदीप शर्मा यांना जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद एनआयएच्या NIA वतीने करण्यात आला आहे.
प्रदीप शर्माचे वकील आबाद पोंडांनी केला विरोध प्रदीप शर्मा ( Encounter Specialist Pradeep Sharma ) यांचे वकील आबाद पोंडा यांनी एनआयएच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादाला जोरदार विरोध केला. एनआयए NIA 4 साक्षीदार असल्याचे सागंत आहे. यातील 2 तर पोलीस कर्मचारीच आहेत. त्यांच्या साक्षीला गृहीत कसे मानणार ? असा युक्तिवाद त्यांच्या वतीने करण्यात आला. इतर दोघांच्या साक्षीत मोठी तफावत आहे. वेळ दोघेही वेगवेगळ्या सांगत असल्याने या साक्षी विश्वासार्ह नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 17 फेब्रुवारी 2021 ला भेट झाल्याचा दावा खोटा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. दोघांच्या जबाबानुसार प्रदीप शर्मा 9 ते 9:30 दरम्यान सांताक्रुजला होते. मात्र CDR लोकेशन नुसार शर्मा साऊथ मुंबईत होते. 17 फेब्रुवारी 2021 ला भेट झाल्याचा जो दावा NIA करत आहे. दोघांच्या लोकेशनमध्ये मोठी तफावत आहे, हे स्पष्ट होते. वाझेचे लोकेशन मस्जिद बंदर तर त्याचवेळी शर्मा यांचे रे रोड, शिवडी आणी चेंबूर परिसरात लोकेशन होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार मनसूख हिरेनचे ( Mansukh Hiren Murder Case ) लोकेशन ऐरोलीत होते ज्या जागी शर्मा कधी गेलेच नाहीत. म्हणजे हे जबाब विश्वासक नाही, असा युक्तिवाद वकील आबाद पोंडा यांनी केला आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण नेमकं काय ? मुकेश अंबानी ( Industrialist Mukesh Ambani ) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन ( Mansukh Hiren Murder Case ) यांची होती. जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत NIA ने सचिन वाझे यांना अटक केली. सध्या ते कोठडीत आहेत. या प्रकरणात आठ आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आठही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.