मुंबई- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) राज्यात कंत्राटी तत्वावर कर्मचारी व आशा स्वयंसेविका काम करतात. या सर्व एनएचएम कंत्राटी कर्मचारी व आशा स्वयंसेविकांकडून विविध मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जात आहे. हे आंदोलन आझाद मैदान येथे केले जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्याकडून हे आंदोलन केले जात आहे. शिक्षणाच्या व अनुभवाच्या आधारे नियमित शासन सेवेमध्ये बिनशर्त समायोजन करणे, नियोजन होईपर्यंत समान काम समान वेतन देणे, आशा स्वयंसेविका यांना प्रति महिना एकत्रित निश्चित मानधन देण्यात येऊन त्यांना सद्यस्थितीत मिळणारे कामावर आधारित मानधन दुप्पट करणे व आशा गटप्रवर्तक यांना २५ दिवसाचा कामावर आधारित मोबदला न देता त्यांनासुध्दा एकत्रित मासिक मानधन देणे, अशा कर्मचऱ्यांच्या मागण्या आहे.
हेही वाचा- मुंबईत ६७२ कोटी खर्च करून शीव रुग्णालयाच्या तीन नवीन इमारती बांधणार
या मागण्या घेऊन आरोग्य अभियानात काम करणारे कर्मचारी व अधिकारी आझाद मैदानात कामबंद आंदोलन करत आहेत. सरकारने जर याची दखल घेतली नाही. तर येत्या निवडणुकीत आरोग्य अभियानात काम करणारे कर्मचारी व अधिकारी आपली भूमिका घेतील व हा लढा अजून तीव्र करतील, असे आरोग्य अभियानात काम करणाऱ्या ऋचा वझे यांनी सांगितले आहे.