ETV Bharat / state

Electricity Workers Strike : राज्यातील वीज कर्मचारी संपावर, 9 तारखेलाच ईटीव्ही भारतवरुन दिला होता इशारा

author img

By

Published : Mar 28, 2022, 7:50 PM IST

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीच्या बॅनरखाली 26 संघटना आणि महाराष्ट्र राज्य वीज क्रांती कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या 12 संघटनांनी 28 आणि 29 मार्च रोजी म्हणजे आज आणि उद्या खासगीकरणाच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. ( Two Days Electricity Workers Strike ) कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे संपूर्ण राज्य अंधारात जाण्याची शक्यता आहे.

Electricity Workers Strike
राज्यातील वीज कर्मचारी संपावर

मुंबई - महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीच्या बॅनरखाली 26 संघटना आणि महाराष्ट्र राज्य वीज क्रांती कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या 12 संघटनांनी 28 आणि 29 मार्च रोजी म्हणजे आज आणि उद्या खासगीकरणाच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. ( Two Days Electricity Workers Strike ) कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे संपूर्ण राज्य अंधारात जाण्याची शक्यता आहे.

आमचा अंत पाहू नका - कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष वामन बुटले म्हणाले की, "आज आणि उद्या दोन दिवस आम्ही संपावर आहोत. या दोन दिवसात आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर यापुढे आमचा बेमुदत संप असेल. यात राज्यातील सर्व पॉवर स्टेशन बंद ठेवण्यात येतील. आमच्या संपाला संपूर्ण राज्यभरातून 90 टक्के उत्तम प्रतिसाद मिळतोय. अनेक कर्मचारी संपावर गेलेत. त्यामुळे आमचं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना आवाहन आहे आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका."

कारवाई थांबवा अन्यथा - संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले होते. यावर बोलताना बुटले म्हणाले की, "आमचा संप दोन दिवसाचा आहे. पण, जर तुम्ही कर्मचाऱ्यांवरती कारवाई केलीत, आमच्या मागण्या मान्य नाही केल्यात तर दोन दिवसाचा संप पुढे बेमुदत असेल. यात तुमच्या सरकारचा राज्यभर आम्ही निषेध करू."

हेही वाचा - Nitin Raut on Strike : वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा- नितीन राऊत यांचे आवाहन

9 मार्चलाच ईटीव्ही भारतवरुन दिला होता इशारा - दरम्यान, आजच्या राज्यव्यापी संपाचा इशारा या कर्मचाऱ्यांनी नऊ तारखेलाच ईटीव्ही भारतवरुन राज्य सरकारला दिला होता. यात त्यांनी संपूर्ण राज्यभरातील पावर स्टेशन बंद ठेवण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे, आता राज्य सरकार या कर्मचाऱ्यांबाबत नेमकी काय भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.