ETV Bharat / state

राज्यभरात विजेच्या मागणीत वाढ, ऊर्जामंत्री राऊत यांची माहिती - ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत बातमी

कोरोनाकाळात घटलेली विजेची मागणी घटली होती. मात्र, आता अनलॉक-4 मुळे निर्बंध शिथल झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत. यामुळे विजेच्या मागणीतही वाढ होत असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

file photo
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Sep 2, 2020, 5:29 PM IST

मुंबई - कोरोनाकाळात राज्याची लॉकडाऊनकडून अनलॉककडे वाटचाल सुरू असताना गणेशोत्सवात विजेची मागणी 14 हजार ते 16 हजार मेगावॉट दरम्यान होती. आता राज्यभरात पावसाचा वेग कमी झाला आणि अनलॉक-4 मुळे निर्बंध शिथिल झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे विजेच्या मागणीत सुमारे दोन हजार मेगावॉटची वाढ झाली असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

विजेची मागणी वाढताच महानिर्मितीच्या परळी वीज केंद्रातील 250 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक 8 आणि भुसावळ वीज केंद्रातील प्रत्येकी 500 मेगावॅट क्षमतेचे संच क्रमांक 4 व 5 मधून वीज उत्पादन सुरू झाले आहे. राज्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी वीज कंपन्यांनी वीज उत्पादन संच सज्ज ठेवावे तसेच तांत्रिक यंत्रणा सक्षम ठेवून कुशल मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करावा, असे निर्देश तिन्ही वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना डॉ. राऊत यांनी दिल्या आहेत. राज्यातील पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागातील वीज यंत्रणा पूर्ववत करण्याचे खडतर आव्हान महावितरण समोर असून युद्धस्तरावर कामे हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाने अनलॉक-4 बाबत नवीन नियमावली जारी केल्यानंतर राज्य शासनाने 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता बऱ्यापैकी शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू झाली आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंटला परवानगी देण्यात आली आहे. दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने यांच्या वेळा वाढवून दिल्या आहेत, उद्योगांची चाके देखील वेग घेत आहेत. एकूणच कोविड-19 आणि लॉकडाऊनमुळे संपूर्ण समाजजीवनाची मंदावलेली गती आता हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असल्याने विजेच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - बाप्पा निघाले गावाला...मुंबईत यंदा १ लाख ३५ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.