मुंबई : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमती सोबतच पर्यावरण रक्षणासाठी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करत प्रदुशन कमी व्हावे यासाठी अलीकडे ईलेक्ट्रिक वाहनांची मागणी आणि चलन वाढत आहे. विविध कंपन्यांनी इलेक्ट्रिकल वाहने बाजारात आणली आहे. आता या वाहनांच्या चार्जिंग सुविधेचा मुद्दा समोर येत आहे. त्यावरही उपाय योजना सुरू आहेत. या गाड्या वाढल्या की पेट्रोल डिझेल पंपा प्रमाणे चार्जिंग सेंटरची आवश्यकता पण वाढणार आहे.
केंद्र व राज्य सरकारकडून प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संतुलनासाठी विद्युत वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. या अंतर्गत विद्युत वाहनांची निर्मिती सोबतच त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांना पण प्रोत्साहन दिले जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईत ठिकठिकाणी विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी सुविधा उभारणीला प्राधान्य दिले आहे. सार्वजनिक वाहनतळांमध्येही इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन निर्मिती करण्याचे नियोजन केले आहे.
![An agreement was signed for the construction of a charging station](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-electric-vehicle-charging-7205149_29032023205019_2903f_1680103219_806.jpg)
या प्रयत्नांचा भाग म्हणून हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने महापालिकेच्या दहा वाहनतळांमध्ये चार्जिंग स्टेशन निर्मिती केली जाणार आहे. या बाबतच्या करारावर बुधवारी छोटेखानी समारंभात स्वाक्षरी करण्यात आली. महापालिका सुरुवातीचे वर्षे चार्जिंग स्टेशनसाठी भाडे आकारणार नाही. मात्र महापालिकेला प्रति युनिट एक रुपया दराने रक्कम मिळणार आहे. या ठिकाणी चार्ज केल्या जाणाऱ्या वाहनांकडून चार्जिंसाठी माफक दर आकारले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक स्टेशनवर साधारण दोन पॉइंट असणार आहेत. म्हणजेच एकावेळी दोन वाहने चार्ज करता येतील.
नवीन व्हेईकल चार्जिंग स्टेशनसाठी काही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या पेट्रेल पंपाजवळील रुणवाल अँथोरियम, मुलुंड पश्चिम भागातील लालबहादूर शास्त्री मार्ग. डॉ. आनंदराव नायर मार्ग, जेकब सर्कल, भायखळा- एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ- एम.जी. एम. हॉस्पिटलजवळ, परळ-शिवडी- ग. द. आंबेकर मार्ग, काळाचौकी, एफ/दक्षिण- हिल रोड व आइस फॅक्टरी लेन यांच्या जंक्शनवर, वांद्रे (पश्चिम) - वसंत ओऍसिसजवळ, मरोळ गांव, अंधेर (पूर्व)- उमिया माता मंदिरामागे, विश्वेश्वर मार्ग, गोरेगाव (पूर्व)- गोरेगाव रेल्वे स्थानक (पश्चिम)- एकसार गाव, देविदास गल्ली, बोरिवली (पश्चिम)