ETV Bharat / state

विधानसभेच्या रणांगणात धडाडणार 'या' शिव व्याख्यात्यांच्या 'तोफा'! - political news

महाराष्ट्राच्या राजकारणावर कायमच ऐतिहासिक घटनांचा प्रभाव दिसून आला आहे. त्यामुळेच इतिहासकार, शिवव्याख्यानकार युवा वक्ते यांची सध्या राजकारणात चलती आहे. हे व्याख्याते सध्या राजकीय पक्षामध्ये स्टार प्रचार म्हणून समोर येत आहे. आणि तरुणाईसाठी ते आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहेत. या वक्त्यांनीही पुरोगामी महाराष्ट्राला साजेशी विचारधारा समाजात पोहोचविण्याचे काम केले आहे.

मुंबई
author img

By

Published : Sep 23, 2019, 1:12 PM IST

मुंबई - निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांनी प्रचाराचा सपाटा जोरात सुरू केला आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याच्या महिनाभरआधीच सर्व पक्षांनी यात्रांचा सपाटा लावला होता. यातून अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. या यात्रांच्या माध्यमातून पक्षांनी अनेक तरुण चेहऱ्यांना व्यासपीठावर 'माईक' चा ताबा घेण्याची संधी दिली. महाराष्ट्राच्या राजकारणावर कायमच ऐतिहासिक घटनांचा प्रभाव दिसून आला आहे. त्यामुळेच इतिहासकार, शिवव्याख्यानकार युवा वक्ते यांची सध्या राजकारणात चलती आहे. हे व्याख्याते सध्या राजकीय पक्षामध्ये स्टार प्रचार म्हणून समोर येत आहे. आणि तरुणाईसाठी ते आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहेत. या वक्त्यांनीही पुरोगामी महाराष्ट्राला साजेशी विचारधारा समाजात पोहोचविण्याचे काम केले आहे. त्या दृष्टीने या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काही खास प्रचारक वक्ते आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत... त्यावर टाकलेली एक नजर...

हेही वाचा - इतिहास 'मनसे' च्या बाजूने! शिवसेनाही कधी काळी होती अडचणीत

अमोल कोल्हे -

डॉ. अमोल रामसिंग कोल्हे हे मराठीतील एक अभिनेते व राजकारणी आहेत. स्टार प्रवाह या वाहिनीवरील 'राजा शिव छत्रपती' या ऐतिहासिक मालिकेपासून ते प्रसिद्धीस आले. 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेमध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे. ते नुकतेच शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार पदी विराजमान झाले आहे.

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत अमोल कोल्हे यांची भाषणे सध्या सोशल मीडियावर चांगलेच हिट होताना पाहायला मिळत आहेत. अमोल कोल्हे यांनी इतिहासाचा दांडगा अभ्यास असून ते आपल्या खास स्टाईलने तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसून येत आहेत.

हेही वाचा - 'शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा बोलबाला'

डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आणि १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.

अमोल मिटकरी -

शिवस्वराज्य यात्रेच्या व्यासपीठावरुन अमोल मिटकरी यांनी खास आपल्या गावरान शैलीत भाषणे केली. तरुणांना भावतील अशाच विषयांना मिटकरी यांनी भाषणांचा केंद्रबिंदू मानला. त्यामुळे राज्यात मोठा तरुणवर्ग त्यांचा चाहता आहे. याचाच संदर्भ घेत राष्ट्रवादीने प्रचारासाठी अमोल कोल्हे यांच्यानंतर लगेच अमोल मिटकरी यांच्या भाषणांचे आयोजन केल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - पक्षांतराचे पर्व... युतीत आले आघाडीचे 'साखर सम्राट' सर्व!

दरम्यान, शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून अमोल मिटकरी यांनी सत्ताधाऱ्यांवर आपल्या शैलीत जोरदार टीका करत तरुणांना आकर्षित केले आहे. काही सभांमध्ये तर त्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची चक्क नक्कल करत त्यांना चांगलेच धारेवर धरले. तरुणांच्या मनातील विषय घेत मिटकरी सभांमध्ये भाषणे करतात. त्यामुळेच तरुणांमध्ये त्यांची क्रेझ पहायला मिळत आहे.

नितीन बानगुडे पाटील -

शिवसेना नेते प्रा. नितीन बानगुडे यांचे नाव सर्वपरिचित आहे. शिवव्याख्यानकार म्हणून त्यांची तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ पहायला मिळत आहे. शिवसेनेच्या विविध कार्यक्रमांमध्ये नितीन बानगुडे आपल्या रांगड्या आवाजात तरुण वर्गाला आकर्षित करत असतात. राज्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

हेही वाचा - साताऱ्यात राष्ट्रवादी सोडणारा कधी खासदार होत नाही - जयंत पाटील

गर्दीचे नवनवीन उच्चांक मांडीत महाराष्ट्रात होणारी त्यांची व्याख्यानेच त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देतात. इतिहासाचा शोध घेत भविष्याचा वेध घेणारी त्यांची ही वर्तमानातील व्याख्याने प्रबोधनाचा नवा जागर घडवणारी ठरली. २०१४ मध्ये नितीन बानगुडे पाटील यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बानगुडे पाटलांची सातारा-सांगली संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केली. त्यानंतर २६ जानेवारी २०१६ मध्ये शिवसेना उपनेते पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सप्टेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र शासन कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) पदी नितीन बानगुडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.3

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची मैदानी तोफ म्हणून नितीन बानगुडे पाटील यांच्याकडे पाहिले जाते.

हे तरुण चेहरेही सोशल मीडियावर हिट -

रोहिल आर पाटील -

दिवंगत राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री आर आर पाटील (आबा) यांचे चिरंजीव रोहित पवार यांचीही सध्या तरुणांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. आबांसारखा सेम टू सेम बोलणारा रोहित सोशल मीडियावरही चांगलाचा ट्रेंडिंगमध्ये आहे. राष्ट्रवादीचा युवा चेहरा म्हणून त्याकडे बघितले जाते. रोहित सध्या जरी राज्याच्या राजकारणात सक्रिय नसला तरी येणाऱ्या काळात तोही दिसेल. पुढील विधानसभेला रोहित पाटील आमदार असेल, असे खुद्द शरद पवार यांनी जाहीरच करुन टाकले आहे.

Intro:Body:

मुंबई - निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांनी प्रचाराचा सपाटा जोरात सुरू केला आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याच्या महिनाभरआधीच सर्व पक्षांनी यात्रांचा सपाटा लावला होता. यातून अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. या यात्रांच्या माध्यमातून पक्षांनी अनेक तरुण चेहऱयांना व्यासपीठावर 'माईक' चा ताबा देण्याची संधी दिली. महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच इतिहासाचा प्रभाव कायमच दिसून आला आहे. त्यामुळेच इतिहासकार, शिवव्याख्यानकार युवा वक्ते सध्या राजकारणात तरुणांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहेत. 

अमोल कोल्हे - 

डॉ. अमोल रामसिंग कोल्हे हे मराठीतील एक अभिनेते व राजकारणी आहेत. स्टार प्रवाह या वाहिनीवरील 'राजा शिव छत्रपती' या ऐतिहासिक मालिकेपासून ते प्रसिद्धीस आले. 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेमध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे. ते नुकतेच शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार पदी विराजमान झाले आहे. 

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत अमोल कोल्हे यांची भाषणे सध्या सोशल मीडियावर चांगलेच हिट होताना पहायला मिळत आहे. अमोल कोल्हे यांनी इतिहासाचा दांडगा अभ्यास असून ते आपल्या खास स्टाईलने तरुणांना आपलंस करतात. 

डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आणि १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.

अमोल मिटकरी - 

शिवस्वराज्या यात्रेच्या व्यासपीठावरुन अमोल मिटकरी यांनी खास आपल्या गावरान शैलीत भाषणे केली. तरुणांना भावतील अश्याच विषयांना मिटकरी यांनी भाषणांचा केंद्रबिंदू मानला. त्यामुळे राज्यात मोठा तरुणवर्ग त्यांचा चाहता आहे. याचाच संदर्भ घेत राष्ट्रवादीने प्रचारासाठी अमोल कोल्हे यांच्यानंतर लगेच अमोल मिटकरी यांच्या भाषणांचे आयोजन केल्याचे बोलले जात आहे.     

दरम्यान, शिवस्वराज्या यात्रेच्या माध्यमातून अमोल मिटकरी यांनी सत्ताधाऱयांनर आपल्या शैलीत जोरदार टीकर करत तरुणांना आकर्षित केले आहे. काही सभांमध्ये तर त्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची चक्क नक्कल करत त्यांना चांगलेच धारेवर धरले. तरुणांच्या मनातील विषय घेत मिटकरी सभांमध्ये भाषणे करतात. त्यामुळेच  तरुणांमध्ये त्यांची क्रेझ पहायला मिळत आहे. 

नितीन बानगुडे पाटील - 

शिवसेना नेते प्रा. नितीन बानगुडे यांचे नाव सर्वपरिचित आहे. शिवव्याख्यानकार म्हणून त्यांची तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ पहायला मिळत आहे. शिवसेनेच्या विविध कार्यक्रमांमध्ये नितीन बानगुडे आपल्या कणखर स्टाईलने तरुण वर्गाला आकर्षित करत असतात. राज्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. 

गर्दीचे नवनवीन उच्चांक मांडीत महाराष्ट्रात होणारी त्यांची व्याख्यानेच त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देतात. इतिहासाचा शोध घेत भविष्याचा वेध घेणारी त्यांची ही वर्तमानातील व्याख्याने प्रबोधनाचा नवा जागर घडवणारी ठरली. २०१४ मध्ये नितीन बानगुडे पाटील यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बानगुडे पाटलांची सातारा-सांगली संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केली. त्यानंतर २६ जानेवारी २०१६ मध्ये शिवसेना उपनेते पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.  तसेच सप्टेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र शासन कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) पदी नितीन बानगुडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.3

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची मैदानी तोफ म्हणून नितीन बानगुडे पाटील यांच्याकडे पाहिले जाते. 

हे तरुण चेहरेही सोशल मीडियावर हिट - 

रोहिल आर पाटील - 

दिवंगत राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री आर आर पाटील (आबा) यांचा चिरंजीव रोहित पवार याचीही सध्या तरुणांमध्ये केझ पहायला मिळत आहे. आबांसारखा सेम टू सेम बोलणारा रोहित सोशल मीडियावरही चांगलाचा ट्रेंडिंगमध्ये आहे. राष्ट्रवादीचा युवा चेहरा म्हणून त्याकडे बघितले जाते. रोहित सध्या जरी राज्याच्या राजकारणात सक्रिय नसला तरी येणाऱया काळात तोही दिसेल. पुढील विधानसभेला रोहित पाटील आमदार असेल असे खुद्द शरद पवार यांनी जाहीरच करुन टाकले आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.