ETV Bharat / state

पवारांच्या 'हट्टा'पोटी काँग्रेसची वाताहात? - शरद पवार

दरम्यान, असे काही मतदारसंघ आहेत जिथे शरद पवार यांच्या हट्टासाठी याचा फटका काँघ्रेसला बसला आहे.

मुंबई
author img

By

Published : Sep 23, 2019, 7:53 AM IST

Updated : Sep 23, 2019, 8:54 AM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 21 आॅक्टोबरला मतदान तर 24 आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक राजकीय पक्षांनी प्रचाराचा सपाटा लावला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. 125-125 जागांचा प्रस्ताव आघाडीने मंजूर केला आहे. त्यामुळे आता कोण्त्या जागा कोणाकडे राहणार यावरून पुन्हा आघाडीत बिनसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, असे काही मतदारसंघ आहेत जिथे शरद पवार यांच्या हट्टासाठी याचा फटका काँग्रेसला बसला आहे.

हेही वाचा - हवशे-गवशांचा महापूर..! सिध्दू'अण्णा विरुध्द सचिन'दादा' काँटे की टक्कर?

इंदापूर मतदारसंघ -

तेव्हाचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदारसंघ हा बालेकिल्ला आहे. हर्षवर्धन पाटील हे येथून सलग चार वेळा निवडून आले आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा काँग्रेसक़डे होती. त्यावेळी काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील यांनी ही निवडणूक लढवली व ते आमदारही झाले होते. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे वेगवेगळे लढले होते. त्यावेळी इंदापूरमध्ये काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील तर, राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणे हे रिंगणात होते. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला होते. तर, हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.

हेही वाचा - पेमरेवाडी मुलभूत सुविधांपासून वंचित; विकासासाठी भाजपवासी झालेले वैभव पिचड आता तरी लक्ष देतील का?

दरम्यान, 2014 विधासभेनंतर याठिकाणी कायमच काँग्रेसला राष्ट्रवादीने डावल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत होता. त्याचे परिणाम राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला जास्त सहन करावे लागत आहेत. दत्तात्रय भरणे यांच्या विजयानंतर इंदापूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने या जागेवर दावा केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तसे आरोपही हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीवर केले आहेत.

लोकसभेत हर्षवर्धन पाटलांची सुप्रिया सुळेंना मदत -

लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांनी आघाडीचा धर्म पाळावा आणि सुप्रिया सुळे यांचा प्रचार करावा म्हणून शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची भेट झाली होती. तर अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे हर्षवर्धन पाटलांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. इंदापूर तालुक्यातून सुप्रिया सुळे यांना ७० हजारांचे मताधिक्य मिळाले होते. सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या मताधिक्यात काँग्रेसचा वाटा मोठा असल्याचा काँग्रेसचा दावा आहे.

हेही वाचा - 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे'.. संपूर्ण ह्युस्टन मोदीमय !

लोकसभेच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांनी विधानसभेला इंदापूरची जागा काँग्रेसला अर्थात हर्षवर्धन पाटील यांना सोडणार असा शब्द दिल्याची चर्चा काँग्रेसमध्ये आहे. मात्र, राजकारणात दिलेला शब्द किती पाळला जातो याचा भरवसा नसतो. तसेच असा काही शब्द दिल्याचे अजित पवार, सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांनीही जाहीरपणे कुठे सांगितलेले नाही.

दरम्यान, हाच शब्द न पाळल्याने मी काँग्रेस सोडत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर सांगितले आहे.

इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा २०१४ चा निकाल

दत्तात्रय भरणे, (राष्ट्र्रवादी) :- १,०८,४०० (विजयी)

हर्षवर्धन पाटील (काँग्रेस) :- ९४,२२७

ज्ञानदेव चवरे (भाजप) :- ४,२६०

विशाल बोन्द्रे (शिवसेना) :- २,१८४

नगर दक्षिण -

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात ज्या काही मोजक्या लढती चर्चेत राहिल्या त्यात अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा चर्चेत होती. अगदी सुरुवातीपासून ते निकाल लागेपर्यंत ही जागा चर्चेत राहिली ती सुजय विखे यांच्या उमेदवारीने. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. त्या जागेवर मोठा प्रयत्न करूनही उमेदवारी न मिळाल्याने सुजय विखे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले, वडील राधाकृष्ण विखे यांनी त्याला उघडपणे साथ दिली आणि मोठा राजकीय संघर्ष सुरू झाला. निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर विखेंनी ही जागा शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या नाकावर टिच्चून मोठ्या मताधिक्क्याने जिंकूनही दाखवली. त्यावेळीही शरद पवार यांच्या हट्टामुळेच ही जागा काँग्रेसला अर्थात सुजय विखेंना सोडण्यात आली नव्हती.

....आणि राधाकृष्ण विखेंचाही काँग्रेसला रामराम -

मुलगा सुजय विखेला नगर दक्षिणमधून काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. आधी सुजय विखे आणि नंतर राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेल्याने राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

बाळासाहेब विखे आणि शरद पवार यांचा वाद

शरद पवार यांच्या हट्टामुळेच राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला अशल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे यानंतर आता विधानसभा निवडणुकीत याचे काही परिणाम कोणाला भोगावे लागत आहेत हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Intro:Body:

मुंबई - विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 21 आॅक्टोबरला मतदान तर 24 आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक राजकीय पक्षांनी प्रचाराचा सपाटा लावला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. 125-125 जागांचा प्रस्ताव आघाडीने मंजूर केला आहे. त्यामुळे आता कोण्त्या जागा कोणाकडे राहणार यावरून पुन्हा आघाडीत बिनसण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, असे काही मतदारसंघ आहेत जिथे शरद पवार यांच्या हट्टासाठी याचा फटका काँघ्रेसला बसला आहे. 

इंदापूर मतदारसंघ - 

तेव्हाचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदारसंघ हा बालेकिल्ला आहे. हर्षवर्धन पाटील हे येथून सलग चार वेळा निवडून आले आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा काँग्रेसक़डे होती. त्यावेळी काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील यांनी ही निवडणूक लढवली व ते आमदारही झाले होते. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे वेगवेगळे लढले होते. त्यावेळी इंदापूरमध्ये काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील तर, राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणे हे रिंगणात होते. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला होते. तर, हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. 

दरम्यान, 2014 विधासभेनंतर याठिकाणी कायमच काँग्रेसला राष्ट्रवादीने डावल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत होता. त्याचे परिणाम राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला जास्त सहन करावे लागत आहेत. दत्तात्रय भरणे यांच्या विजयानंतर इंदापूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने या जागेवर दावा केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तसे आरोपही हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीवर केले आहेत. 

लोकसभेत हर्षवर्धन पाटलांची सुप्रिया सुळेंना मदत - 

लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांनी आघाडीचा धर्म पाळावा आणि सुप्रिया सुळे यांचा प्रचार करावा म्हणून शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची भेट झाली होती.  तर अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे हर्षवर्धन पाटलांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. इंदापूर तालुक्यातून सुप्रिया सुळे यांना ७० हजारांचे मताधिक्य मिळाले होते. सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या मताधिक्यात काँग्रेसचा वाटा मोठा असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. 

लोकसभेच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांनी विधानसभेला इंदापूरची जागा काँग्रेसला अर्थात हर्षवर्धन पाटील यांना सोडणार असा शब्द दिल्याची चर्चा काँग्रेसमध्ये आहे. मात्र, राजकारणात दिलेला शब्द किती पाळला जातो याचा भरवसा नसतो. तसेच असा काही शब्द दिल्याचे अजित पवार, सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांनीही जाहीरपणे कुठे सांगितलेले नाही. 

दरम्यान, हाच शब्द न पाळल्याने मी काँग्रेस सोडत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर सांगितले आहे.  

इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा २०१४ चा निकाल

दत्तात्रय भरणे, (राष्ट्र्रवादी)  :- १,०८,४०० (विजयी)

हर्षवर्धन पाटील  (काँग्रेस) :- ९४,२२७

ज्ञानदेव चवरे  (भाजप)  :- ४,२६०

विशाल बोन्द्रे (शिवसेना) :- २,१८४

बाळासाहेब विखे आणि शरद पवार यांचा वाद

नगर दक्षिण - 

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात ज्या काही मोजक्या लढती चर्चेत राहिल्या त्यात अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा चर्चेत होती. अगदी सुरुवातीपासून ते निकाल लागेपर्यंत ही जागा चर्चेत राहिली ती सुजय विखे यांच्या उमेदवारीने. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. त्या जागेवर मोठा प्रयत्न करूनही उमेदवारी न मिळाल्याने सुजय विखे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले, वडील राधाकृष्ण विखे यांनी त्याला उघडपणे साथ दिली आणि मोठा राजकीय संघर्ष सुरू झाला. निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर विखेंनी ही जागा शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या नाकावर टिच्चून मोठ्या मताधिक्क्याने जिंकूनही दाखवली. त्यावेळीही शरद पवार यांच्या हट्टामुळेच ही जागा काँग्रेसला अर्थात सुजय विखेंना सोडण्यात आली नव्हती. 

....आणि राधाकृष्ण विखेंचाही काँग्रेसला रामराम - 

मुलगा सुजय विखेला नगर दक्षिणमधून काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. आधी सुजय विखे आणि नंतर राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेल्याने राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. 

शरद पवार यांच्या हट्टामुळेच राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला अशल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे यानंतर आता विधानसभा निवडणुकीत याचे काही परिणाम कोणाला भोगावे लागत आहेत हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. 

Conclusion:
Last Updated : Sep 23, 2019, 8:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.