ETV Bharat / state

लोकसभा रणधुमाळी : राज्यात सुमारे 4 हजाराने मतदान केंद्रे वाढली

राज्यात सुमारे 4 हजार नवीन मतदान केंद्र वाढल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोग
author img

By

Published : Mar 23, 2019, 8:05 AM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून मतदारांची नाव नोंदणी अद्यापही सुरू आहे. नाव नोंदणीची प्रक्रिया निवडणुकी आधीपर्यंत सुरू असणार आहे, यामुळे राज्यात सुमारे 4हजार नवीन मतदान केंद्र वाढल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदार केंद्रे होती. तर 2009 मध्ये एकूण 83 हजार 986 मतदार केंद्र स्थापन करण्यात आली. 2014 मध्ये एकूण 91 हजार 329 मतदार केंद्र स्थापन करण्यात आली. यंदाच्या निवडणुकीमध्ये 95 हजार 473 मतदान केंद्र स्थापन करण्यात येतील. यामध्ये ग्रामीण भागात 55 हजार 814 तर शहरी भागात 39 हजार 659 मतदान केंद्रे असतील, असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मतदान केंद्रावर असणार 'या' सुविधा -
केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 8 प्रकारच्या मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. त्यात वृद्ध नागरिकांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा आणि फर्निचर या किमान सुविधा यांचा समावेश आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

संवेदनशील मतदान केंद्रवार सुरक्षा -
मतदान केंद्रावर पोहोचण्यास मतदारास त्रास होऊ नये, याची काळजी आयोगामार्फत घेण्यात येते. मतदार केंद्रांची 'संवेदनशीलता' बघून त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते. मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिध्दी, संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत ठरवून देण्यात आलेली असते असे निवडणूक विभागाने कळविले आहे.

Intro:मुंबई -
लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून मतदारांची नाव नोंदणी अद्यापही सुरु आहे. नाव नोंदणीची प्रक्रिया निवडणुकी आधीपर्यंत सुरु असणार आहे, यामुळे राज्यात सुमारे चार हजार नवीन मतदान केंद्रे वाढल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. Body:2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदार केंद्रे होती. तर 2009 मध्ये एकूण 83 हजार 986 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. 2014 मध्ये एकूण 91 हजार 329 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. यंदाच्या निवडणुकीमध्ये 95 हजार 473 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येतील. यामध्ये ग्रामीण भागात 55 हजार 814 तर शहरी भागात 39 हजार 659 मतदान केंद्रे असतील, असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मतदान केंद्रावर या सुविधा -
केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 8 प्रकारच्या मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. त्यात वृद्ध नागरिकांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा आणि फर्निचर या किमान सुविधा यांचा समावेश आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

संवेदनशील मतदान केंद्रवार सुरक्षा -
मतदान केंद्रावर पोचण्यास मतदारास त्रास होऊ नये याची काळजी आयोगामार्फत घेण्यात येते. मतदार केंद्रांची 'संवेदनशीलता' बघून त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते. मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिध्दी, संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत ठरवून देण्यात आलेली असते असे निवडणूक विभागाने कळविले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.