मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारचा पुढील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसतील का अशा चर्चांना राज्यात ऊत आला आहे. त्याला कारण ठरली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत. या मुलाखतीत त्यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री पदावरुन तर्क-वितर्क काढले जात आहेत. शिंदे- फडणवीस सरकारला स्थापन एक वर्ष पूर्ण झाले आहे, त्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत एका वृत्तवाहिनी घेतली होती. या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री पदावर हे विधान केले आहे.
शिंदे नसणार मुख्यमंत्री : पुढील वर्षी राज्यात विधानसभा आणि देशात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकासाठी सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. याच दरम्यान आघाडी-युतीची चर्चा सुरू झाल्या आहेत. याचबरोबर मुख्यमंत्रीपदावरुनही चर्चा होत आहेत. यात भाजपा-शिंदे गट युतीच्या मुख्यमंत्रीपदावरून अनेक तर्क लावले जात आहेत. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाबाबत युतीत अजून भूमिका स्पष्ट नसल्याचे म्हटले आहे. यामुळे पुढील निवडणुकीत शिंदे मुख्यमंत्री नसतील अशी चर्चा सुरू झाली आहे. या मुलाखतीत फडणवीसांनी आपली महत्त्वकांक्षा बोलून दाखवली. फडणवीस म्हणाले की, 2024 मध्ये मध्ये माझी महत्त्वकांक्षा ही लोकसभा निवडणुकीत 42 जागा किंवा त्यापेक्षा जास्त जागांवर विजय मिळवणं आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वकांक्षा महाविकास आघाडीचा या विधानसभेत सुफडा साप करायचा.
निवडणुका शिंदेंच्याच नेतृत्वाखाली पण.. : पुढील विधानसभा एकनाथ शिंदेच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या जातील, असे भाजपने जाहीर केले आहे. यामुळे शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे चेहऱ्या असतील असं म्हटले जात आहे. पण त्यासंदर्भात युतीमध्ये अजून स्पष्ट भूमिका ठरलेली नाही, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत केले. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी युतीकडून ‘वेगळा निर्णय’ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा ठरवण्याचा निर्णय पक्षातील वरीष्ठ निर्णय घेतील, असेही फडणवीस म्हणाले. या विधानाचे स्पष्टीकरण त्यांना फडणवीस म्हणाले की, नेत्याच्या नेतृत्वात निवडणुका लढवणे आणि त्यानंतर त्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर बसवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
हेही वाचा -