ETV Bharat / state

राज्यपालांनी शेतकऱ्यांना ताबडतोब मदत करावी - शिंदे

राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या पद्धतीने त्यांनी त्यावेळी ताबडतोब निर्णय घेतला त्याप्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्याचाही निर्णय ताबडतोब घ्यावा, असे वक्तव्य आमदार एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

बोलताना एकनाथ शिंदे
author img

By

Published : Nov 14, 2019, 5:39 PM IST

मुंबई - राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आत्महत्येच्या घटनाही घडत आहेत. त्यातच राज्यात राष्ट्रपती राजवट लागून झाली असून शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे तसेच शासकीय मदतीची प्रक्रिया थंडावली आहे. आम्ही सत्ता स्थापनेसाठी वेळ वाढवून मागितली तर वेळ वाढवून न देता त्यांनी ताबडतोब आमची मागणी फेटाळली. ज्या पद्धतीने त्यांनी त्यावेळी ताबडतोब निर्णय घेतला त्याप्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्याचाही निर्णय ताबडतोब घ्यावा, असे वक्तव्य आमदार एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, या मागणीसाठी आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार संघटनेने राजभवनावर मोर्चा काढला. त्या मोर्चाला भेट देत बच्चु कडूंशी चर्चा करण्यासाठी आले असता आ. शिंदे बोलत होते. यावेळी सचिन अहिर, अनिल परब यांनी ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

हेही वाचा - उद्धव ठाकरे सांगली, साताऱ्यातील दुष्काळग्रस्त गावांना देणार भेट

बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उद्या (शुक्रवार) उद्धव ठाकरे हे पश्चिम महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांवर लाठी चार्ज झाला असेल त्याचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत सरकार आमचेच येणार असून लवकरच सर्व नीट होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दर्शविला.

हेही वाचा - ओल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राजभवनावर 'प्रहार', बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात

Intro:फ्लॅश Body: एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू व आंदोलकांची घेतली भेट
शेतकऱ्यांचा प्रश्नांवर बच्चू कडू यांच्याशी शिंदे , सचिन अहिर , अनिल परब यांनी ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेलं आहे त्यांना मदत व धीर देण्यासाठी राज्यपालांनी ताबडतोब मदत करणं गरजेचं आहे
सरकार अस्तित्वात येण्यासाठी शिवसेनेनं दावा केला आहे पण राज्यपालांनी वेळ न देता आमची वेळ फेटाळली
बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन केले आहे शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे
असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला
उद्या उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत
पण आम्ही लवकरच सरकार स्थापन करू
शेतकऱ्यांवर लाठी चार्ज झाला असेल त्याचा आम्ही निषेध करतो
सरकार आमचं येणार आहे लवकरच सर्व नीट होईलConclusion:फीड कॅमेरा07लाईव्ह वरून पाठवलेला आहे फीड रूम मध्ये पाहावे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.