ETV Bharat / state

CM Eknath Shinde : राज्यात २५ नवीन सिव्हिल हॉस्पिटल उभारणार? नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे; वाचा सविस्तर - Public health issues in Maharashtra

CM Eknath Shinde : राज्यात २५ नवीन सिव्हिल हॉस्टिपल उभारण्यात येणार आहेत. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सोमवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राज्यात नविन सिव्हिल रुग्णालय, मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल उभारणी आणि आणखी वैद्यकीय सुविधांबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना माहिती दिली.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 7:21 AM IST

Updated : Oct 10, 2023, 7:30 AM IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचीदेखील उभारणी केली जाईल

मुंबई CM Eknath Shinde : सिव्हिल हॉस्पिटलबद्दल होणारे विलंब आणि होणारी गैरसोय यासाठी 25 ठिकाणी नवीन सिव्हिल हॉस्पिटल सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका दिवसात 25 मृत्यू झाले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या इतर शासकीय रुग्णालयांतूही मृत्यू झाले. त्यामुळं राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सोमवारी मुंबईत एक बैठक घेण्यात आली.

मनुष्यबळाचा अभाव : सध्या राज्यातील विविध शासकीय रुग्णालयात होत असलेल्या मृत्यूचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. अशात वर्षानुवर्षे आरोग्य विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यावर विरोधकांनी आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरात लवकर भरण्याची मागणी केली आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयात वाढत असलेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्रालयात आरोग्य विभागाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीनंतर राज्यातील एकूण आरोग्य सुविधांबाबत तसेच नवीन सिव्हिल रुग्णालय, मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल उभारणी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना माहिती दिली.

राज्यात २५ ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल : या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या बैठकीत राज्यात २५ ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल उभारण्याबाबत चर्चा झाली. त्याचसोबत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचीदेखील उभारणी केली जाईल. याप्रसंगी सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज हे समांतरपणे काम करतील. तसंच यात पॅरामेडिकल कोर्सेसदेखील सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात येतील : पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, आरोग्य विभागाच्या रिक्त असलेल्या जागा या लवकरात लवकर भरण्यात येतील. आरोग्य विभागावर योग्य तो खर्च करण्यात येईल. त्याचप्रमाणे राज्यातील ग्रामीण रुग्णालय आणि सबसेंटरचं इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा सुधारलं जाईल. इतकंच नाही तर आरोग्य विभागाचं बजेटसुद्धा दुप्पट करण्यात येणार आहे. त्यासाठी पैसे कमी पडू देणार नाही. याप्रसंगी रुग्णांच्या वाढत असलेल्या ओपीडी कॅपॅसिटीवर सुद्धा चर्चा करण्यात आली. राज्यात सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटल उभं करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून आरोग्य यंत्रणेसाठी योग्य ती मदत होईल, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. Aaditya Thackeray : वाढत्या रुग्ण मृत्यू प्रकरणावर आम्हला राजकारण करायचं नाही, पण...- आदित्य ठाकरे
  2. Sassoon Hospital Pune : 'ससून'ची व्यवस्था व्हेंटिलेटरवर? 'ईटीव्ही भारत'चा Reality चेक
  3. Supriya Sule On Nanded Patients Death Case : नांदेडच्‍या रुग्णालयातील मृत्‍यूसत्रावरून सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या, 'सरकारच्या हलगर्जीमुळेच...'

Last Updated : Oct 10, 2023, 7:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.