मुंबई/नागपूर Eknath Shinde : मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यात भारतीय जनता पार्टीनं अभूतपूर्व यश संपादित केलं आहे. लोकसभेची सेमी फायनल मानण्यात येणाऱ्या या निवडणुकीत भाजपानं काँग्रेसला मोठा धक्का दिला. या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
-
विकास और विश्वास,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
देश केवल मोदीजी के साथ ! #ModiKiGuarantee #NarendraModi #Bjp #ElectionResult2023
">विकास और विश्वास,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 3, 2023
देश केवल मोदीजी के साथ ! #ModiKiGuarantee #NarendraModi #Bjp #ElectionResult2023विकास और विश्वास,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 3, 2023
देश केवल मोदीजी के साथ ! #ModiKiGuarantee #NarendraModi #Bjp #ElectionResult2023
'मन मन मोदी' : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेलं काम आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नियोजनामुळे भाजपाला यश मिळालं असल्याचं ते म्हणाले. "आतापर्यंत 'घर घर में मोदी' असं म्हटलं जायचं, आता 'मन मन में मोदी' असं पाहायला मिळतंय", असं त्यांनी सांगितलं. "नरेंद्र मोदींनी भारताचं नाव जगभरात मोठं केलं. जगात ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. आजच्या निवडणुकींच्या निकालांवरुन हे पुन्हा एकदा सिद्ध झालं", असं ते म्हणाले.
-
पत्रकारांशी संवाद..
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
03-12-2023 📍मुंबई https://t.co/gQid08Fdu2
">पत्रकारांशी संवाद..
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 3, 2023
03-12-2023 📍मुंबई https://t.co/gQid08Fdu2पत्रकारांशी संवाद..
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 3, 2023
03-12-2023 📍मुंबई https://t.co/gQid08Fdu2
परदेशात जाऊन 'भारत तोडो' प्रचार केला : पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी येत्या निवडणुकांमध्ये जनता काँग्रेसला हद्दपार करेल, असा दावा केला. "आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये INDIA आघाडीचं पानिपत होईल. २०२४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स तोडून पुन्हा पंतप्रधान बनतील", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "राहुल गांधी यांनी देशभरात 'भारत जोडो यात्रा' केली. मात्र परदेशात जाऊन त्यांनी 'भारत तोडो' असा प्रचार केला. जनतेनं आता त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे", असं मुख्यमंत्री म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीनही राज्यांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. भाजपाच्या या ऐतिहासिक विजयावर फडणवीस यांनी अतिशय मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली. "मी या निकालावर आनंदी आहे. मात्र आता एवढंच बोलेल. यावर नंतर सविस्तर प्रतिक्रिया देईल", असं ते म्हणाले. ट्विट करुन त्यांनी जनतेचं आणि मोदींबद्दल विश्वास दाखवल्याचं अभिनंदन केलं.
हेही वाचा :