ETV Bharat / state

Eknath Shinde : सिंहाशी लढण्यासाठी शेळ्या-मेंढ्या एकत्र येऊ शकत नाही, एकनाथ शिंदे विरोधकांवर बरसले

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 10:37 AM IST

Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विरोधी पक्षाच्या आघाडीवर सडकून टीका केली. 'सिंहाशी लढण्यासाठी शेळ्या-मेंढ्या एकत्र येऊ शकत नाही', असं ते म्हणाले.

Eknath Shinde
एकनाथ शिंदे

मुंबई Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. 'विरोधी पक्ष फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्याचा विचार करतात. परंतु शेळ्या कधी सिंहाशी मुकाबला करू शकत नाही', असं ते म्हणाले.

सिंहाशी लढायला शेळ्या एकत्र येऊ शकत नाही : भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) नेतृत्वाखालील एनडीएला आव्हान देण्यासाठी विरोधक एकत्र येत असल्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले की, 'जंगलात सिंहाशी लढण्यासाठी शेळ्या-मेंढ्या एकत्र येऊ शकत नाही. सिंह हा नेहमीच सिंह असतो. त्यामुळेच तो जंगलावर राज्य करतो. विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्याचा विचार करतात. मला या स्पर्धेत ते कुठेही उभे राहिलेले दिसत नाहीत', असं ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर नाव न घेताना निशाणा साधला : यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. 'आम्ही लोकांसाठी काम करत आहोत. लोकं ठरवतील की, त्यांना त्यांच्यासाठी काम करणारी व्यक्ती निवडायची आहे, की फक्त घरी बसलेली व्यक्ती निवडायची आहे', असं शिंदे म्हणाले. विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट करण्यासाठी ईडीचा वापर केला जात असल्याच्या आरोप विरोधक वारंवार करतात. त्यासंबंधी प्रश्नावर बोलताना, 'भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा संशय असलेल्यांवर ईडी कारवाई करते. ते विनाकारण कोणालाही त्रास देत नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकारला कोणताही धोका नाही : महाराष्ट्रातील एनडीएच्या स्थितीबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, 'अजित पवारांनी आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझ्या सरकारला २१५ हून अधिक आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. आता सरकारला कोणताही धोका नाही', असं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातून लोकसभेत ४८ सदस्य निवडून येतात. लोकसभा सदस्यसंख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेशानंतर राज्याचा दुसरा क्रमांक आहे. उत्तर प्रदेशातून लोकसभेत ८० सदस्य निवडले जातात.

हेही वाचा :

  1. Shiv Sena Petition Supreme Court : राज्यासाठी आजचा दिवस महत्वाचा, शिवसेनेसंबंधी दोन याचिकांवर सुनावणी
  2. Eknath Shinde to visit Germany : विरोधकांच्या सततच्या टीकेनंतर 'या' कारणानं मुख्यमंत्री करणार जर्मनीचा दौरा
  3. Sushilkumar Shinde : प्रणिती शिंदेंच्या तिकिटासाठी हायकमांडकडं विनंती करणार; सुशीलकुमार शिंदेंचं वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.