ETV Bharat / state

खडसेंचा लांबलेला प्रवेश आणि शिवसेनेची नाराजी - एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज (शुक्रवार) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. खडसेंच्या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्र आणि बहुजन समाज पक्षातील एक मोठा मतदारवर्ग राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे
author img

By

Published : Oct 23, 2020, 4:53 PM IST

Updated : Oct 23, 2020, 6:50 PM IST

मुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज (शुक्रवार) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. खडसेंच्या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्र आणि बहुजन समाज पक्षातील एक मोठा मतदारवर्ग राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या प्रवेशाच्या नेमक्या काही मिनिटांपूर्वी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बैठक झाली. ही बैठक प्रदीर्घ चाचल्याने खडसेंच्या प्रवेशाला सुमारे तासभर विलंब झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सध्या कॉरंटाईन असल्याने या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. पण, त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा झाली. या दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांसाठीच्या मदत पॅकेजची घोषणा केली. यामुळे महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस समोर आल्याचे दिसून आले.

शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांची चर्चा

एकनाथ खडसे यांच्या प्रवेशापूर्वी शरद पवार आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची वाय. बी. सेंटरला महत्त्वपूर्ण बैठक झाली. ही बैठक बराच काळ चालल्याने खडसेंच्या प्रवेशाला विलंब झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यालयात प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित होते. शरद पवार या कार्यक्रमाला कधी येतात याची आतुरतेने वाट बघत होते. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सध्या गृहनिर्माणमंत्रीपद आहे. त्यांना राष्ट्रवादीत महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात येणार असून हे मंत्रिपद खडसेंकडे जाणार असल्याचे सांगितले जात होते. या विषयावरच पवार आणि आव्हाडांची चर्चा झाल्याचे चर्चेत होते. पण खडसेंच्या प्रवेशानंतर पवार यांनी जाहीर केले की मंत्रिमंडळात कोणताही बदल केला जाणार नाही.

अजित पवार यांची कार्यक्रमाला अनुपस्थिती

अजित पवार यांना कोरोना झाला असल्याचे वृत्त काल काही माध्यमांमध्ये उमटले होते. मात्र, अजित पवार यांचा मुलगा पार्थ याने लगेच ट्विट करून कोरोना झाला नसल्याचे स्पष्ट केले. सध्या अजित पवार घरीच विलगीकरणात आहेत. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशावर अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते या सोहळ्याला उपस्थित राहले नाही, अशी चर्चा आहे. पण यावर कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

मुख्यमंत्र्यांची आयत्या वेळी पत्रकार परिषद

एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयत्या वेळी ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. एवढी मोठी घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सोबत घेऊन केली जाईल, असे अपेक्षित होते. पण, अशा अचानक घोषणेने उद्धव यांची नाराजी समोर आली. एकनाथ खडसे यांना कृषिमंत्रीपद दिले जाईल, असा कयास सुरुवातील लावण्यात येत होता. पण, शिवसेना हे मंत्रीपद सोडायला सध्या तयार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला जितेंद्र आव्हाड यांचा बळी द्यावा लागण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्या यांचा महाविकास आघाडीवर प्रहार

भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी अगदी जेव्हा एकनाथ खडसे यांचा प्रवेशाचा कार्यक्रम सुरू होणार होता, तेव्हाच एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुंबई महानगरपालिकेचा भोंगळ कारभार आणि भूखंड घोटाळ्यावर माहिती दिली. खडसे यांचा प्रवेश सुरू असताना याच दरम्यान पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी मीडियाचे लक्ष आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. खडसे हेच घडामोडींचे मध्य राहिले.

कृषिमंत्रीपद आणि शिवसेनेची नाराजी

एकनाथ खडसे यांच्या प्रवेशावर शिवसेनेची अगदी आधीपासून नाराजी दिसून आली. खडसे राष्ट्रवादीत जाणार, असे जाहीर झाल्यावर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगेच आम्ही आधी खडसेंना गळ लावला होता. पण त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे बोलून दाखवले. खडसे बऱ्याच दिवसांपासून नाराज होते. फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, यावर त्यांची नाराजी होती. त्यानंतर फडणवीसांनी त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला. तेव्हापासून ते शिवसेनेत जातील अशी चर्चा होती. शिवसेनेकडून त्यांना आमंत्रणही दिले गेले होते. पण खडसेंचेच तळ्यात मळ्यात सुरू होते.

पंकजा मुंडे यांना शिवसेनेची हाक

शिवसेना नेते, पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनीही काल पंकजा यांना साद घातली होती. खडसे राष्ट्रवादीत गेल्याने आता बऱ्याच दिवसांपासून नाराज असलेल्या पंकजा शिवसेनेत जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंडे यांनी आता सीमोल्लंघन करायचे आहे, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. खडसेंच्या प्रवेशानंतर याचे बरेच अर्थ काढण्यात आले. पण प्रत्येक दसरा मेळाव्यात पंकजा अशा स्वरुपाचे विधान करतात, असे दिसून येते.

राष्ट्रवादीने भाजपचा टॉपचा नेता पटकावला

खडसेंच्या रुपाने राष्ट्रवादीने भाजपचा टॉपचा मोहरा आपल्या पदरात पाडून घेतला आहे. याचे भाजपला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. दुसरीकडे पंकजा याही नाराज असल्याने ओबीसी मतदार भाजपपासून दूर जातील असे सांगितले जात आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण, मुहूर्त काही लागत नव्हता. राष्ट्रवादीतील काही नेत्यांची नाराजी याला कारणीभूत होती. पण, अखेर शरद पवार यांनी कणखर भूमिका घेत खडसेंचा प्रवेश घडवून आणला.

खडसेंचा मुलीसह प्रवेश, पण सुनबाई मात्र भाजपमध्ये

एकनाथ खडसे यांनी मुलगी रोहिणीसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. रोहिणी यांना एकनाथ खडसे यांच्या राजकीय वारस मानले जाते. आता त्याच राष्ट्रवादीत गेल्याने खडसेंची पुढची पिढीही याच पक्षात राहील असे दिसून येते. खडसेंच्या सूनबाई रक्षाताई सध्या रावेर मतदारसंघातून खासदार आहेत. भाजपच्या तिकीटावर त्या निवडून गेल्या होत्या. त्यांनी भाजपमध्येच राहण्याची घोषणा केली आहे. यामागे एकनाथ खडसे यांची काही राजकीय चाल असावी, असा कयास बांधण्यात येत आहे.

Last Updated : Oct 23, 2020, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.