मुंबई : Eknath Khadse Claims : राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यावेळी इतर आठ राष्ट्रवादीचे (NCP Political Crisis) आमदारही अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले. अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले, तर इतर राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. बंड झाल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत कोण, तर अजित पवार यांच्यासोबत कोण अशी चर्चा सुरू झाली होती. अजूनही यात स्पष्टता आली नाही. यावर आता आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse Join Ajit Pawar Faction) यांनी स्पष्टीकरण दिलंय.
मला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा अजित पवार यांच्या वतीनं फोन आला होता. अजित पवार गटात सहभागी होण्याची ऑफर मला मिटकरी यांनी दिली होती. त्यांना मी शरद पवारांशी एकनिष्ठ असल्याचं स्पष्टपणे सांगितलं - एकनाथ खडसे, आमदार, राष्ट्रवादी शरद पवार गट
गिरीश महाजनांचा सल्ला : एकनाथ खडसे यांचे जळगाव जिल्ह्यातील राजकीय प्रतिस्पर्धी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी खडसे यांना सल्ला दिलाय. एकनाथ खडसे हे अजित पवार गटात जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं मला समजलं, पण माझा त्यांना सल्ला आहे की शरद पवारांना त्यांनी सोडू नये. त्यांनी शरद पवारांसोबत राहावं, असं महाजन म्हणाले.
राष्ट्रवादीत सत्तासंघर्ष : अजित पवार आणि राष्ट्रवादीचे इतर आठ आमदार या वर्षी जुलैमध्ये शिवसेना-भाजपा सरकारमध्ये सामील झाले. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामो़डी घडल्या होत्या. राष्ट्रवादी फुटलीच नसल्याची विधानेही अनेकांनी केली होती. दरम्यान, आम्हीच खरे राष्ट्रवादी आहोत, असा दावाही दोन्ही गटांकडून करण्यात आला होता. सध्या हे प्रकरण निवडणूक आयोगाकडं प्रलंबित आहे.
हेही वाचा -
- Chandrakant Bawankule On Eknath Khadse : कोणी उभं राहीलं तरी रक्षा खडसेंचाच विजयी, एकनाथ खडसेंना भाजपाचं प्रत्युत्तर
- Girish Mahajan Reaction: एकनाथ खडसेंना नसते धंदे कुणी सांगितले? मंत्री गिरीश महाजन यांचा सवाल
- Eknath Khadase On SS-BJP Alliance Break : 2014 मध्ये भाजपनेच युती तोडली होती; मोदी जे बोलले ते अर्धसत्य - एकनाथ खडसे