ETV Bharat / state

काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्याध्यक्षपदी एकनाथ गायकवाड!

काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्याध्यक्षपदी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची आज नियुक्ती केली आहे.

एकनाथ गायकवाड
author img

By

Published : Jul 26, 2019, 7:23 PM IST

मुंबई - काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्याध्यक्षपदी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची आज नियुक्ती केली आहे. यासाठी ऑल इंडिया काँग्रेस कम‍िटीचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी ही नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे.

CONGRESS
काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्याध्यक्षपदी एकनाथ गायकवाड!

मागील काही महिन्यांपासून काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मिलिंद देवरा यांनी दिल्यानंतर हे पद रिकामे झाले होते. त्यामुळे मुंबई प्रदेश काँग्रेसचे कामकाज अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यातच प्रदेशाध्यक्षच नसल्याने कोणत्याही प्रकारचे मोठे कार्यक्रम आणि सरकारविरोधातील भूमिकाही घेतल्या जात नव्हत्या. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना त्यासाठीच्या तयारीसाठीही कोणत्या हालचालीही होत नसल्याने आज काँग्रेसने तुर्तास एकनाथ गायकवाड यांच्यावर मुंबई प्रदेशच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली असून इतर पदांची यादीही लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

मुंबईत काँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीत एकनाथ गायकवाड हे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधी गटातील नेते म्हणून ओळखले जात असले तरी काँग्रेसच्या जुन्या नेत्यांमध्ये त्यांची बरीच चलती आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत गायकवाड यांच्या प्रचाराला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री आदी अनेक नेत्यांनी त्यांच्या मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या होत्या तर, काही अपवाद वगळता निरूपम यांच्या मतदारसंघात अनेक नेते फिरकलेही नव्हते. त्यापार्श्वभूमीवर गायकवाड यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असली तरी त्यांना मुंबईत नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड होईपर्यंत कोणतेही मोठे निर्णय घेणे कठीण होणार आहे.

Intro:काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्याध्यक्षपदी एकनाथ गायवाड यांची नियुक्ती
Body:काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्याध्यक्षपदी एकनाथ गायवाड यांची नियुक्ती
(फाईल फुटले वापरावेत)
मुंबई,ता. २६ :
काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्याध्यक्षपदी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची आज नियुक्ती केली आहे. यासाठी ऑल इंडिया काँग्रेस कम‍िटीचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपार यांनी ही नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे.
मागील काही महिन्यापासून काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मिलिंद देवरा यांनी दिल्यानंतर हे पद रिकामे राहिले असल्याने मुंबई प्रदेश काँग्रेसचे कामकाज अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यातच प्रदेशाध्यक्षच नसल्याने कोणत्याही प्रकारचे मोठे कार्यक्रम आणि सरकार विरोधातील भूमिकाही घेतल्या जात नव्हत्या. त्यातच विधानसभा निवडणुका या तोंडावर आल्या असताना त्यासाठीच्या तयारीसाठीही कोणत्या हालचालीही होत नसल्याने आज काँग्रेसने तुर्तास एकनाथ गायकवाड यांच्यावर मुंबई प्रदेशच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली असून इतर पदांची यादीही लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
मुंबईत काँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीत एकनाथ गायकवाड हे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधी गटातील नेते म्हणून ओळखले जात असले तरी काँग्रेसच्या जुन्या नेत्यांमध्ये त्यांची बरीच चलती आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत गायकवाड यांच्या प्रचाराला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री आदी अनेक नेत्यांनी त्यांच्या मतदार संघात प्रचार सभा घेतल्या होत्या. तर काही अपवाद वगळता निरूपम यांच्या मतदार संघात अनेक नेते फिरकलेही नव्हते. त्यापार्श्वभूमीवर गायकवाड यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी त्यांना मुंबईत नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड होईलपर्यंत कोणतेही मोठे निर्णय घेणे कठीण होणार आहे. Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.