मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवाशांसाठी 8 विशेष लोकल रेल्वे चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.
मेन लाईन - अप विशेष
- कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विशेष कल्याण येथून 1 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 2.30 वाजता पोहोचेल.
- कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून 2.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 3.45 वाजता पोहोचेल.
मेन लाईन - डाउन विशेष
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 3 वाजता पोहोचेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 2.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 4 वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन - अप विशेष
- पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून 1.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 2.35 वाजता पोहोचेल.
- पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून 2.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 3.50 वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन - डाउन विशेष
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 3 वाजता पोहोचेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 2.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 4 वाजता पोहोचेल.
हे ही वाचा - ST Workers Strike : ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर; छोटे व्यापारी- शेतकरी संकटात!