ETV Bharat / state

Elevator collapsed : कमला मिलमध्ये ट्रेड वर्ड बिल्डिंगची लिफ्ट कोसळून 8 जण जखमी - ट्रेड वर्ड बिल्डिंगची लिफ्ट कोसळून

लोअर परळ येथील ट्रेड वर्ड इमारतीची लिफ्ट कोसळून आठ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना ग्लोबल आणि पालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती ठीक आहे.

Elevator collapsed
Elevator collapsed
author img

By

Published : Jun 21, 2023, 5:25 PM IST

मुंबई : लोअर परळ येथील ट्रेड वर्ड बिल्डिंगची लिफ्ट कोसळून आठ जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजता घडली. घटनेतील जखमींना ग्लोबल आणि पालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई पालिका आपत्कालीन विभागाने दिली.

घटनेत 14 जण जखमी : लोअर परळ येथे वर्ल्ड ट्रेड तळमजला अधिक 16 मजल्याची इमारत आहे. सकाळी 10 वाजून 49 मिनिटाने चौथ्या मजल्यावरील लिफ्ट कोसळून 8 जण जखमी झाले. स्थानिक आणि सुरक्षा रक्षकांनी तात्काळ धाव घेऊन अडकून पडलेल्यांची सुटका केली. त्यापैकी 8 जखमींना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तर एकाला केईएम हॉस्पिटलात दाखल केले आहे. किरकोळ जखमी झालेल्या 4 जणांना उपचार करून घरी पाठवण्यात आले.

जखमींची नावे : प्रियंका चव्हाण- 26, प्रतीक शिंदे 26, अमित शिंदे 25, मोहमद रशीद 21, प्रियांका पाटील 28, सुधीर सहारे 29, मयूर गोरे 28, तृप्ती कुबल 46 या आठ जणांना ग्लोबल रुग्णालयात दाखल केले. तर किरण विश्वनाथ चौकेकर वय ४८ यांना केईएम रुग्णालय दाखल केल्यास सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

विकसकावर गुन्हा दाखल : तसेच 23 मार्च रोजी वरळीतील जाफर मंझिल इमारतीचे काम सुरू असताना बुधवारी रात्री ११व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून होती त्यांत आठ कामगार जखमी झाले होते. त्यापैकी काहींना कायमचे अपंगत्व येण्याचा धोका आहे. बिल्डरच्या चुकीमुळे हा प्रकार घडला असून डी.बी. वाहतूक पोलिसांनी व्यापारी विकसकावर गुन्हा दाखल केला होता.

11व्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली : जानेवारीमध्ये माटुंगा येथील ला सोनारिसा इमारतीच्या बांधकामादरम्यान लिफ्टच्या अपघातात पाच कामगारांचा मृत्यू झाला होता. मात्र यातून बांधकाम व्यावसायिक काहीच शिकले नसल्याचे आजच्या दुर्घटनेतून समोर आले आहे. सुपर सिनेमासमोरील जाफर मंझील इमारतीवर काम करणारे 8 मजूर लिफ्टने 11व्या मजल्यावर जात असताना 11व्या मजल्यावर आल्यानंतर लिफ्ट तुटली. लिफ्ट प्रचंड वेगाने खाली पडली. पोलिसांनी इम्तियाज शेख, गुलाम नबी, अहमद शेख आणि मर्चंट डेव्हलपर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.