ETV Bharat / state

कांजूरमार्गमध्ये आठ फुटी अजगर, तर मुलुंडमध्ये आढळला तस्कर साप - तस्कर साप

कांजूरमार्गमध्ये आठ फुटी अजगर तर, मुलुंडमध्ये सापडला एक फूट लांबीचा अजगर आणि तस्कर साप आढळला. त्यांना सर्पमित्रांकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आहे.

अजगरासह सर्पमित्र
अजगरासह सर्पमित्र
author img

By

Published : Jun 28, 2020, 9:05 AM IST

Updated : Jun 28, 2020, 9:54 AM IST

मुंबई - पाऊस सुरू झाल्याने वन्यजीव भरकटून मानवी वस्तीकडे जाण्याचे प्रकार घडतात. कांजूरमार्गमध्ये आठ फुटी अजगर तर, मुलुंडमध्ये एक फूट लांबीचा अजगर व एक तस्कर जातीचा साप सापडला आहे. त्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

माहिती देताना सर्पमित्र

कांजूरमार्ग एल.बी.एस. मार्ग येथे अवंती कन्स्ट्रक्शन साईटच्या जवळ एक महाकाय अजगर आढळला. प्लँट अॅण्ड अॅनिमल वेल्फेयर सोसायटी व अम्मा केअर फाउंडेशनचे स्वयंसेवक हसमुख वळंजू यांना याबाबत संतोष बावकर यांनी माहिती दिली. त्यानंतर वळंजू मध्यरात्री अडीच वाजता हा आठ फुटी अजगर पकडला. त्यानंतर अजगराची सुटका करून त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले, अशी माहिती पॉज-मुंबई एसीएफचे संस्थापक सुनीष सुब्रमण्यम यांनी दिली.

तर, सकाळी साडेसहाच्या सुमारास मुलुंड येथील रमेश चव्हाण यांच्या घरावरील एक फुटी अजगर आणि मुलुंड पश्चिमच्या अमर नगर येथील एका घरावर तस्कर प्रजातीचा साप दिसला. स्थानिक रहिवाशी विशाल सुरडकर यांनी याबाबात माहिती दिली. त्यानंतर त्या एक फुटी अजगराला व तस्कर सापाला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.

पालापाचोळ्याचे ढीग करून अजगर मादी त्यात नऊ ते दहा अंडी घालते. अंडी नऊ ते दहा सेंटिमीटर लांबीची व सुमारे 100 ग्रॅम वजनाची असतात. नव्वद ते शंभर दिवसांत पिल्ले अंड्यातून बाहेर येतात व त्या पिलांची लांबी जवळपास 30 सेंटीमीटर इतकी असते. अजगराचे प्रमुख खाद्य उंदीर, घूस, बेडूक व इतर सस्तन मोठे प्राणी आहे. अजगराची अधिकतम लांबी अंदाजे 24 फुट इतकी वाढते.

तस्कर साप बिनविषारी आहे. हा साप मुंबईमध्ये दुर्मिळ आहे. या सापाची सरासरी लांबी सहा फूट इतकी होते. याचे प्रमुख खाद्य इतर पक्ष्यांची अंडी पक्षी व उंदीर असतो.

हेही वाचा - मेट्रो प्रकल्पातील मजूर पुन्हा मुंबईच्या वाटेवर; एमएमआरडीएचा जीव भांड्यात

Last Updated : Jun 28, 2020, 9:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.