ETV Bharat / state

‘तौक्ते’ चक्रीवादळाचा 46 लाख वीज ग्राहकांना फटका - cyclone tauktae impact

राज्यातील जवळपास 46 लाख 41 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला तर 34 लाख 14 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. याचा सगळ्यात मोठा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून यामुळे 7 लाख 85 हजार 519 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 5 लाख 50 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले आहे.

minister nitin raut
उर्जामंत्री डॅा. नितीन राऊत
author img

By

Published : May 18, 2021, 8:09 PM IST

मुंबई - तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यातील जवळपास 46 लाख 41 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला तर 34 लाख 14 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणेसह इतर जिल्ह्यातील 10752 गावांतील वीज यंत्रणेचे नुकसान झाले आहे. सध्या खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून 6040 गावातील वीजपुरवठा आज संध्याकाळपर्यंत सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे.

शेकडो विजेचे खांब पडले, तारा तुटल्या तर फिडर ट्रिप झाले.

अंधाऱ्या रात्री तिमिराची तमा न बाळगता व रात्रभर जागून महावितरणाने नागरिकांना सेवा दिली तसेच आताही वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांचे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरण कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

क्षतिग्रस्त खांबांची दुरुस्ती
राज्यात एकूण 1546 उच्चदाब खांब वादळामुळे पडून क्षतीग्रस्त झाले. त्यापैकी 425 दुरुस्त करण्यात आले आहे तर, एकूण 3940 लघुदाबाचे खांबापैकी 974 दुरुस्त करण्यात आले आहे. तसेच राज्यात एकूण 93 हजार 935 रोहित्रांमध्ये बिघाड झाला होता त्यापैकी 68 हजार 426 दुरुस्त करण्यात आले आहे. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर अविरतपणे काम करून अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला. या कामात स्थानिकांनी महावितरणाच्या अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञांना खूप सहकार्य केले. त्याबद्दलही ऊर्जामंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.

विविध ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे निर्देश

चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन ऊर्जामंत्र्यांनी कृती आराखडा तयार करून विविध ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. तसेच अधिकाधिक मनुष्यबळ वापरण्याचे व लागणारी पुरेशी सामुग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कोल्हापूर, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाण्यासाठी 24 तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सध्या कार्यरत आहेत. तसेच विभाग स्तरावर 46 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे झालेले नुकसान बघता सुमारे 622 रोहित्रे, 350 किमी लांबीचे केबल, तसेच साडे तीन हजार किमी इतक्या लांबीचे वायर्स व 20 हजार 500 खांब उपलब्ध करून दिले आहेत. नुकसानग्रस्त भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीने 13 हजार तंत्रज्ञाना कामी लावले आहे. ज्यामध्ये महावितरणाचे 9 हजारहुन अधिक तसेच कंत्राटी पध्दतीवरील कार्यरत 4 हजारहून अधिक मनुष्यबळ सध्या वीज पुरवठा सुरळीत करत आहेत. तसेच या कामासाठी 200 हुन अधिक लहान मोठे ट्रक, सुमारे 50 क्रेन व जेसीबी मशीन आणि सर्व उपकरणांनी सज्ज अश्या 200 चमू या कामासाठी अहोरात्र कार्यरत आहेत.

46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम

या चक्रीवादळामुळे राज्यातील जवळपास 46 लाख 41 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला तर 34 लाख 14 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. याचा सगळ्यात मोठा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून यामुळे 7 लाख 85 हजार 519 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 5 लाख 50 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले आहे.

  • या चक्रीवादळाचा दुसरा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला असून यामुळे 7 लाख 73 हजार 760 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 5 लाख 10 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले.
  • पालघर जिल्ह्यात 5 लाख 88 हजार 743 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 2 लाख 44 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले.
  • रत्नागिरी जिल्ह्यात 5 लाख 45 हजार 121 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 4 लाख 18 हजार 360 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले.
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 लाख 66 हजार 11 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 67 हजार 166 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले.
  • नाशिक जिल्ह्यात 3 लाख 29 हजार 304 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 2 लाख 72 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
  • कोल्हापूर जिल्ह्यात 2 लाख 96 हजार 965 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 2 लाख 49 हजार 601 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
  • सातारा जिल्ह्यात 4 लाख 36 हजार 768 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता तर 4 लाख 8 हजार 89 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
  • पुणे जिल्ह्यात 1 लाख 66 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 1 लाख 48 हजार 112 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
  • सांगली जिल्ह्यात 1 लाख 55 हजार 543 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 1 लाख 53 हजार 715 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
  • विदर्भात एकूण 53 हजार 392 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर जवळपास 50 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
  • मराठवाड्यात 1 लाख 5 हजार 142 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 1 लाख 3 हजार 924 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.