ETV Bharat / state

शिक्षण ‘शिक्षक केंद्रित’ न राहता ते ‘विद्यार्थी केंद्रित’ व्हावे- राज्यपाल कोश्यारी - higher education change seminar

शिक्षण केवळ रोजगाराभिमुख न राहता ते चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविणारे असावे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. चर्चासत्राला मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक, राज्यमंत्री संजय धोत्रे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीचे अध्यक्ष के. कस्तुरीरंगन आदी उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी
राज्यपाल कोश्यारी
author img

By

Published : Sep 7, 2020, 7:23 PM IST

मुंबई- नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना शिक्षण ‘शिक्षक केंद्रित’ न राहता ते ‘विद्यार्थी केंद्रित’ व्हावे, तसेच धोरण प्रत्यक्षात आणताना लहान समित्यांच्या माध्यमातून सूक्ष्म व्यवस्थापनावर भर द्यावा, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षणात परिवर्तन, या विषयावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चर्चासत्राचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी राजभवन, मुंबई येथून सहभागी होत वरील प्रतिपादन केले. डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेले नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पथदर्शी आहे. शैक्षणिक धोरणाला कृतीमध्ये उतरवताना सदाचार व संस्कारावर भर द्यावा लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.

तसेच, शिक्षण केवळ रोजगाराभिमुख न राहता ते चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविणारे असावे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. चर्चासत्राला मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल निशंक, राज्यमंत्री संजय धोत्रे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीचे अध्यक्ष के. कस्तुरीरंगन आदी उपस्थित होते.

हेही वाचा- कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका' कार्यालयाची पालिका अधिकाऱ्यांकडून तपासणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.