मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची 6 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील महत्त्वाचा सूत्रधार नंदकिशोर चतुर्वेदी ( Nandkishor Chaturvedi ) हा फरार झाला आहे. त्याने देशातून पळ काढल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाल्याचे सांगितले जात आहे. ईडी चतुर्वेदीच्या मागावर आहे. तसेच, कारवाईच्या भीतीने तो भारत सोडून पसार झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नंदकिशोर चतुर्वेदी हा देश आणि मुंबई सोडून परदेशात गेल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीच्या कारवाईनंतर चतुर्वेदी हा रडारवर आला आहे. गेल्या 9 महिन्यांपासून ईडी चतुर्वेदीच्या मागावर होती. या व्यक्तीच्या नावावर अनेक शेल कंपन्या आहेत. शेल कंपन्यांमार्फत हवाला पैसा जमा करण्याचे काम याच्याकडेच आहे. विशेष म्हणजे, चतुर्वेदी हा पेशाने सीए आहे. तो हवाला ऑपरेटर असून त्याचे ठाकरे परिवाराशी अत्यंत जवळचे संबंध असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.
-
ED to approach court seeking nonbailable warrant against Hawala operator Nandkishor Chaturvedi in the Pushpak Bullion case
— ANI (@ANI) March 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Chaturvedi had transferred Rs 30 crores Shridhar Patankar's company, who is brother-in-law of Maharashtra CM Uddhav Thackeray
">ED to approach court seeking nonbailable warrant against Hawala operator Nandkishor Chaturvedi in the Pushpak Bullion case
— ANI (@ANI) March 26, 2022
Chaturvedi had transferred Rs 30 crores Shridhar Patankar's company, who is brother-in-law of Maharashtra CM Uddhav ThackerayED to approach court seeking nonbailable warrant against Hawala operator Nandkishor Chaturvedi in the Pushpak Bullion case
— ANI (@ANI) March 26, 2022
Chaturvedi had transferred Rs 30 crores Shridhar Patankar's company, who is brother-in-law of Maharashtra CM Uddhav Thackeray