ETV Bharat / state

Anil Ambani : अनिल अंबानींच्या मागे चौकशीचा ससेमिरा, ED ने FEMA अंतर्गत नोंदवला जबाब

ईडीने फेमा कायद्याशी संबंधित (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट) प्रकरणी अनिल अंबानी यांचा जबाब नोंदवला आहे. याआधीही अनिल अंबानी २०२० मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीसमोर हजर झाले होते. ते प्रकरण येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर यांच्याशी संबंधित होते.

Anil Ambani
Anil Ambani
author img

By

Published : Jul 3, 2023, 9:50 PM IST

मुंबई : कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेले उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. रिलायन्स एडीए समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी आज सकाळी १० वाजता ईडीसमोर हजर झाले. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने फेमा कायद्याशी संबंधित (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट) प्रकरणी त्यांचा जबाब नोंदवला आहे. याआधीही अनिल अंबानी २०२० मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीसमोर हजर झाले होते. ते प्रकरण येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर यांच्याशी संबंधित होते.

2020 मध्ये येस बँकेच्या प्रकरणातही चौकशी झाली होती : 2020 मध्ये अनिल अंबानी येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर आणि इतरांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हजर झाले होते. तसेच त्यावेळी अनिल अंबानी यांची 9 तास चौकशी करण्यात आली होती. अनिल अंबानी समूहाच्या 9 कंपन्यांनी यस बँकेकडून 12800 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

करचुकवेगिरीचा आरोपही त्यांच्यावर झाला होता : आयकर विभागाने अनिल अंबानी यांना ब्लॅक मनी ऍक्ट अंतर्गत कारणे दाखवा नोटीसही पाठवली होती. अनिल अंबानी यांच्यावर स्विस बँकेतील दोन खात्यांमध्ये 814 कोटी रुपयांची अघोषित रक्कम ठेवल्याचा आरोप होता. त्यात 420 कोटी रुपयांची करचोरी केल्याचा आरोप होता. ज्यासाठी आयकर विभागाने नोटीस बजावली होती. नंतर अनिल अंबानी यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती.

सप्टेंबर 2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अनिल अंबानी यांना 420 कोटी रुपयांच्या करचुकवेगिरीच्या प्रकरणात दिलासा दिला. त्यानंतर न्यायालयाने आयकर विभागाला अनिल अंबानी यांच्यावर कोणताही दबाव आणू नये असे निर्देश दिले होते. अंबानी यांच्यामागे कारवाईचे शुक्लकाष्ठच लागल्याचे दिसत आहे. नुकतेच राज्यसरकारनेही कारवाई करुन त्यांच्याकडील विमानतळांच्या व्यवस्थापनाचे कामही काढून घेण्यात आले आहे. सुरुवातीला काहीकाळ मोठे भाऊ मुकेश अंबानी हे त्यांच्या मदतीला धावून आले होते. आता या प्रकरणात मुकेश अंबानी त्यांना काही मदत करतात का हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.