ETV Bharat / state

ED raid in Mumbai : दोनशे कोटींचे ड्रग्ज युरोपसह ऑस्ट्रेलियात पाठवल्याचं प्रकरण, ईडीची मुंबईत छापेमारी

ED raid in Mumbai : ईडीनं ड्रग्ज तस्करी प्रकरणात मुंबईत सात ठिकाणी छापेमारी केली. ड्रग्ज माफियांनी २०० कोटींचे ड्रग्ज मुंबईतून विदेशात पाठविल्याचा आरोप आहे. त्यावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

ED raid in Mumbai
ED raid in Mumbai
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 2:13 PM IST

Updated : Oct 17, 2023, 4:51 PM IST

मुंबई : वाँटेड ड्रग्ज माफिया कैलाश राजपूतचा जवळचा साथीदार ड्रग्ज माफिया अली असगर शिराझी याच्याविरोधात ईडीनं कारवाईचा फास आवळला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ड्रग्ज माफिया अली असगर याच्याविरोधात अमली पदार्थांच्या तस्करीच्या खटल्याचा भाग म्हणून ईडीनं मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. याशिवाय, या प्रकरणासंदर्भात काही लोकांना ईडीनं समन्स बजावलं आहे. शिराझी याच्यावर २०० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची युरोप आणि ऑस्ट्रेलियात तस्करी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणीच ईडीनं मुंबईतील सात ठिकाणी छापेमारी केली.

ड्रग्ज मुंबईतून विदेशात पाठवल्याचा ठपका - मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी कक्षानं मे महिन्यात असगर शिराझी (वय ४०) याला अटक केली होती. मार्चमध्ये मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या केटामाइन आणि व्हायग्रा तस्करी प्रकरणात शिराझी हा महत्त्वाचा दुवा असल्याचे म्हटले जात होते. मुंबई पोलिसांनी 15 मार्चला अंधेरी पूर्व येथील कुरिअर कार्यालयावर छापा टाकून सुमारे 8 कोटी रुपये किमतीचे 15 किलो केटामाइन आणि व्हायग्राच्या 23 हजार गोळ्या जप्त केल्या होत्या. जप्त केलेल्या साहित्याची कुरिअर सेवेचा वापर करून ऑस्ट्रेलिया आणि यूकेमध्ये तस्करी केली जात असल्याचा आरोप आहे. याच प्रकरणी ईडीनं दखल घेऊन ड्रग्ज माफिया शिराझी त्याच्याशी संबंधित मुंबईत छापेमारी केली आहे. दोनशे कोटींचे ड्रग्ज मुंबईतून विदेशात पाठवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

अली असगर शिराझी दाऊदचा साथीदार - अंधेरीत कुरियर कंपनीवर छापा टाकून त्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली होती. तर कैलास राजपूत आणि दानिश मुल्ला हे दोन्ही आरोपी अद्याप फरार होते. त्यानंतर दानिश मुल्लाला अटक करण्यात आली. अली असगर शिराझी हा फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार आहे. तसंच कैलाश राजपूतचाही जवळचा सहकारी आहे.

प्रतिबंधित औषधांची निर्यात - भारतातील वाँटेड कैलास राजपूतासाठी सिंडिकेट हाताळणाऱ्या शिराझीच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. शिराझीच्या मदतीनं राजपूत यूके, यूएसए आणि ऑस्ट्रेलियामध्ये केटामाइनसारख्या प्रतिबंधित औषधांची निर्यात करत होता. ही आयात-निर्यात कुरिअर कंपन्यांच्या मदतीने झाली, असा दावादेखील मुंबई पोलिसांनी केला होता.

हेही वाचा-

  1. ED Raids On Gold Trader : १३ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; सोने व्यापाऱ्याची 315 कोटीची मालमत्ता जप्त
  2. ED Raid : राष्ट्रवादीच्या माजी खजिनदारावर ईडीची मोठी कारवाई! 315 कोटींच्या 70 मालमत्तेवर टाच

Last Updated : Oct 17, 2023, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.