ETV Bharat / state

Nawab Malik : नबाब मलिक आणि नातेवाईकांची मालमत्ता जप्त करण्याची ईडीकडून हालचाली - Nawab Malik and relatives property seize

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाब मलिक यांच्या आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे ईडीने नवाब मलिक यांची आणि नातेवाईकांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली ( Nawab Malik and relatives Property confiscation ) आहे. नवाब मलिक यांची 15 कोटी 15 लाख रुपये इतकी मालमत्ता तात्पुरती जप्त केली ( ED seized Nawab Malik Asset ) होती.

Nawab Malik
नबाब मलिक
author img

By

Published : Nov 5, 2022, 9:24 AM IST

मुंबई : माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाब मलिक यांच्या आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे ईडीने नवाब मलिक यांची आणि नातेवाईकांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली ( Nawab Malik and relatives Property confiscation ) आहे. ईडीच्या कायदेशीर टीमने तात्पुरती जप्त केलेली मालमत्ता जप्त करण्याच्या संदर्भात ईडी अधिकाऱ्यांना हिरवा कंदील दाखवला आहे त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून लवकरच मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टामध्ये या संदर्भात अर्ज करण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांची 15 कोटी 15 लाख रुपये इतकी मालमत्ता तात्पुरती जप्त केली ( ED seized Nawab Malik Asset ) होती.

तात्पुरत्या जप्तीची पुष्टी : नवाब मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेच्या तात्पुरत्या जप्तीची पुष्टी न्यायनिर्णय प्राधिकरणाने नुकतीच केली आहे. त्यात गोवाला कंपाऊंडचा परिसर आणि कुर्ला पश्चिमेला तीन फ्लॅट्स, वांद्रे पश्चिमेला दोन फ्लॅट्स आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 147 एकर शेतजमिनीचा समावेश आहे. या मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत ईडीचे अधिकारी त्यांच्या कायदेशीर टीमशी चर्चा करत आहेत.

फेब्रुवारीमध्ये मलिक यांना अटक : गँगस्टर दाऊद इब्राहिम याची दिवंगत बहीण हसिना पारकर हिच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने फेब्रुवारीमध्ये मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ईडीने मलिक कुटुंबाची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. या मालमत्ता नवाब मलिक, त्यांचे कुटुंबीय, सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड ( Solids Investment Private Limited ) आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चरशी (Malik Infrastructure ) संबंधित आहेत.

मलिक न्यायालयीन कोठडीत : मलिक न्यायालयीन कोठडीत असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हसीना पारकर, तिचा साथीदार सलीम पटेल, सरदार खान यांच्यामदतीने नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोटातील दोषींसह कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंडमध्ये एका महिलेची तीन एकर जमीन बेकायदेशीरपणे हडप करण्याच्या गुन्हेगारी कटात भाग घेतल्याचा आरोप ईडीने केला आहे.

कंपनीला विकल्याचा आरोप : पटेल यांच्यावर मुखत्यारपत्राचा गैरवापर केल्याचा आणि हसिना पारकरच्या सूचनेनुसार गोवाला मालमत्ता मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे. हसिना पारकर यांनी सुमारे दोन दशकांपूर्वी गोवाला कंपाऊंडचा ताबा घेतला होता. जेव्हा पारकर हिने मालमत्तेवरील तिचे हक्क विकण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिने मलिक आणि सरदार खान यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या ज्यांच्याकडे कंपाऊंडमध्ये एक बांधकाम आहे. नवाब मलिक यांनी सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्सच्या माध्यमातून खान यांना 5 लाख रुपये देऊन खरेदी केली असा आरोप आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.