ETV Bharat / state

टॉप्स सिक्युरिटी प्रकरण; एमएमआरडीएच्या आयुक्तांना ईडीचे समन्स - Tops Security money laundering news

एमएमआरडीच्या विविध साईट्सवर सुरक्षारक्षक ठेवण्यासाठी टॉप्स सिक्युरीटीला कंत्राट देण्यात आले होते. टॉप्स सिक्युरिटीकडून देण्यात आलेल्या मनुष्यबळापेक्षा अधिक सुरक्षारक्षकांचे पैसे टॉप्स ग्रुप सिक्युरिटला देण्यात आले होते.

टॉप्स सिक्युरिटी प्रकरण
टॉप्स सिक्युरिटी प्रकरण
author img

By

Published : Feb 15, 2021, 12:59 PM IST

मुंबई- एमएमआरडीएला सुरक्षारक्षक देण्याच्या नावाखाली १७५ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या बाबतीत ईडीकडून टॉप्स ग्रुपच्या संदर्भात तपास केला जात आहे. याप्रकरणी टॉप्सचा मालक अमित चांदोले याला अटक करण्यात आल्यानंतर पुढील तपासासाठी एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आला आहे.

केवळ ७० टक्के दिले सुरक्षा रक्षक
एमएमआरडीच्या विविध साईट्सवर सुरक्षारक्षक ठेवण्यासाठी टॉप्स सिक्युरीटीला कंत्राट देण्यात आले होते. टॉप्स सिक्युरिटीकडून देण्यात आलेल्या मनुष्यबळापेक्षा अधिक सुरक्षारक्षकांचे पैसे टॉप्स ग्रुप सिक्युरिटला देण्यात आले होते. एमएमआरडीएकडून ३५० ते ५०० सुरक्षारक्षकांची मागणी करण्यात आली होती. मात्र, केवळ ७० टक्के सुरक्षारक्षक टॉप सिक्युरिटीकडून देण्यात आले. पण पैसे अधिक घेतले गेल्याचे तपासात समोर आले होते.

एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांना लाच
यासंदर्भात आतापर्यंत टॉप सिक्युरिटीच्या अमित चांदोले यास अटक करण्यात आलेली असून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचीसुद्धा दोन वेळा चौकशी करण्यात आलेली आहे. अमित चांदोले हा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा जवळचा मानला जात असून यासंदर्भात ईडीकडून अधिक तपास सुरू आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार एमएमआरडीएच्या काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना लाच देऊन सदरचे पैसे उकळण्यात आल्याचेही म्हटले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.