ETV Bharat / state

केंद्राच्या अर्थसंकल्पाचा राज्याच्या अर्थसंकल्पावर परिणाम - अर्थमंत्री अजित पवार

author img

By

Published : Jan 28, 2021, 3:39 PM IST

राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना केंद्राने अर्थसंकल्प कसा सादर केला याचा आधार राज्य अर्थ संकल्प सादर करत असताना घेत असतात. त्यामुळे केंद्राच्या अर्थसंकल्पची छाप राज्यांच्या अर्थसंकल्पावर जाणवत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

मुंबई
मुंबई

मुंबई - 1 फेब्रुवारीला केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्या अर्थसंकल्पावर आमची बारीक नजर असून या अर्थसंकल्पातून कोणत्या वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार हे पहावे लागणार असल्याचे मत राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी व्यक्त केले.

मुंबई

मध्यमवर्ग करदात्याला दिलासा मिळणार का नाही, तसेच कोणत्या वर्गाला झुकते माप अर्थसंकल्पातून दिले जाणार याकडे देखील लक्ष असणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना केंद्राने अर्थसंकल्प कसा सादर केला याचा आधार राज्य अर्थ संकल्प सादर करत असताना घेत असतात. त्यामुळे केंद्राच्या अर्थसंकल्पची छाप राज्यांच्या अर्थसंकल्पावर जाणवत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

जीएसटीचा परतावा वेळेलवर मिळत नसल्याची खंत

"वन नेशन वन टॅक्स" वर आधारित देशाची कर प्रणाली सुरू करण्यात आली. ही प्रणाली सुरू करताना राज्याला ठराविक वर्षांपर्यंत ठराविक निधी केंद्राकडून दिला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, अजूनही केंद्राकडून जीएसटीचा परतावा योग्य वेळेत मिळत नसल्याने राज्यात अडचणी निर्माण होत असल्याची खंत अजित पवार यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.