ETV Bharat / state

Fake Fitness Certificate रेल्वेच्या सुस्साट नोकरीकरिता बनविले फिटनेसचे प्रमाणपत्र, दुकलीला अटक - मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक बनावट पक्ष

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक परिसरात ( Mumbai crime news ) बनावट प्रमाणपत्रे आणि ओळखपत्रे बनवून त्याची विक्री गरजूंना करणारी टोळी सक्रिय आहे, अशी खबरींमार्फत गुप्त माहिती पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाला मिळाली होती. त्यानुसार १७ ऑक्टोबर रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर त्यांनी धाड टाकली.

रेल्वे प्रमाणपत्र
रेल्वे प्रमाणपत्र
author img

By

Published : Oct 27, 2022, 3:30 PM IST

मुंबई : भारतीय रेल्वेमध्ये नोकरीसाठी गरजूंना अवघ्या ६०० रुपयात फिटनेस सर्टिफिकेट ( fake fitness certificate for railway job ) आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे बनवून देणाऱ्या टोळीचा मंगळवारी पश्चिम रेल्वेच्या ( west railway vigilance squad ) दक्षता पथकाने पर्दाफाश केला आहे. या दक्षता पथकाने एका दुकलीला मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटक केल्यानंतर दुकलीकडून विविध प्रकारचे साहित्य हस्तगत करण्यात ( duo arrested in Mumbai ) आले आहे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक परिसरात ( Mumbai crime news ) बनावट प्रमाणपत्रे आणि ओळखपत्रे बनवून त्याची विक्री गरजूंना करणारी टोळी सक्रिय आहे, अशी खबरींमार्फत गुप्त माहिती पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाला मिळाली होती. त्यानुसार १७ ऑक्टोबर रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर त्यांनी धाड टाकली. त्यात दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीत बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) जारी करणे, आयआरसीटीसी ओळखपत्र, पोलीस पडताळणी प्रमाणपत्रे, आयआरसीटीसी प्रवासी प्राधिकरण, रेल्वे पास प्रवास प्राधिकरण इत्यादी कागदपत्रे त्यांनी बेकायदेशीरपणे बनवल्याची आणि त्यांची विक्री केल्याची कबुली त्यांनी दिली.

६०० रुपये आकारल्याचेही उघड सर्टिफिकेटच्या बदल्यात एका व्यक्तीकडून ६०० रुपये आकारल्याचेही उघड झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. रेल्वे ही लांब पल्ल्याच्या गाडीत अटेंडंट, स्वच्छता कर्मचारी आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी कंत्राटी तत्त्वावर आऊट सोर्सिंगने कर्मचारी नियुक्त करते. अशा लोकांना ही दुकली बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र पुरवत असल्याचे अद्याप चौकशीत समोर आले आहे. मात्र, रेल्वेत कायमस्वरूपी नोकरीसाठी या कागदपत्रांचा वापर झाल्याचे पुरावे नसून आम्ही याप्रकरणी पुढील तपास करत आहोत, अशी माहिती मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदारी पवार यांनी दिली.

नोकरीची आमिष दाखवून फसवणिारी टोळी विदेशात नोकरी मिळवून देण्याकरिता फसविणाऱ्या टोळीचा पोलिसांनी नोएडामध्ये मे महिन्यात पर्दाफाश ( Noida Police busted a gang ) केला होता. नोएडा पोलीस स्टेशन सेक्टर 113 आणि आयटी सेलच्या माध्यमातून या टोळीतील 10 जणांना छापा टाकून ( fake job ad gang noida ) अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी प्रथम आरोपी पवनला सेक्टर 70 पोलीस स्टेशन फेज-3 मधून अटक केली. त्यांच्या सांगण्यावरून मयूर विहार फेज-1 येथून 9 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून सुमारे साडेसात लाखांची रोकड जप्त करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.