मुंबई: आज सकाळी अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक विभागात बत्ती गुल झाली. ऐन उन्हाळ्यात बत्ती गुल झाल प्रचंड उकड्यामुळे नागरिकांचे हाल झाले. मुंबईच्या बाजूच्या काही जिल्हातही वीज पुरवठा खंडित झाली आहे. याबाबत मुंबई शहराला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्टने दिलेल्या माहितीनुसार टाटाच्या कळवा पडघा येथील 400 केव्ही लाईन सकाळी 10.15 वाजता ट्रिप झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला.
वीज पुरवठा खंडित झाल्या नंतर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उदंचन केंद्रावरील पंप बंद करण्यात आल्याने मुंबईत २० टक्के पाणी कपात करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच उंचावरील भागात पाण्याचा दाब कमी राहील, प्राप्त माहितीनुसार मुंबईत अनेक ठिकाणी वीज पुरवठा पुन्हा सुरू झाला आहे. काही ठिकाणी वीज पुरवठा टप्प्याटप्याने सूरु करण्यात येत आहे.