ETV Bharat / state

ST workers Strike : तब्बल 15 हजार बसेस धूळखात; टायरसह अनेक भाग खराब होण्याचा मार्गावर - एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू

मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर ( ST Workers Strike ) आहेत. त्यामुळे राज्यातील 15 हजार एसटी बसेस आगारातच तळ ठोकून उभ्या आहेत. यामुळे बसेसची कार्यक्षमता कमी होत आहे. एसटीच्या टायरसह अनेक भाग गंज पकडल्याने खराब होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, एसटीच्या देखभाल खर्चात वाढ होऊ लागली आहे. आणखी काही काळ संप असाच सुरू राहिल्यास एसटी महामंडळाला कोट्यवधी रूपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Dec 29, 2021, 7:39 PM IST

मुंबई - मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर ( ST Workers Strike ) आहेत. त्यामुळे राज्यातील 15 हजार एसटी बसेस आगारातच तळ ठोकून उभ्या आहेत. रस्त्यावर धावणाऱ्या लालपरी सलग दोन महिने एकाच जागीच उभ्या असल्याने बसेसची कार्यक्षमता कमी होत आहे. एसटीच्या टायरसह अनेक भाग गंज पकडल्याने खराब होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, एसटीच्या देखभाल खर्चात वाढ होऊ लागली आहे. आणखी काही काळ संप असाच सुरू राहिल्यास एसटी महामंडळाला कोट्यवधी रूपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागेल, अशी माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

टायर निकामी होण्याचा मार्गावर -

टाळेबंदीमुळे मागील दीड वर्षांपासून एसटीचे नुकसान होत आहे. त्यानंतर आता मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या संपामुळे एसटीचे कंबरडे मोडले आहे. दोन महिने होऊनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसह लालपरीचेही मोठे नुकसान होत आहे. राज्यभरातील सुमारे 15 हजार बसेस आगारात धूळ खात उभ्या आहे. एसटी एकाच ठिकाणी उभ्या असल्याने टायरवर मोठ्या प्रमाणात प्रेशर येत आहे. त्यामुळे अनेक बस गाड्यांचे टायर खराब होण्याचा मार्गावर आहे.

बसची अवस्था जर्जर -

अनेक दिवसांपासून एसटी बसेस एकाच जागेवर उभ्या असल्याने बॅटरी डिस्चार्ज होत आहे. त्यामुळे बॅटरीचे मेंटेनेंस वाढले आहे. आधीच प्रवाशांसाठी बसची अवस्था चांगली नाही. बसची अवस्था जर्जर झाली आहे. आसने तुटलेल्या असल्यामुळे बसमधील भाग हलतात. त्यातच आता टाळेबंदीनंतर संपामुळे बसेसची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. त्यातच बसेस उभ्या असल्याने एसटीच्या देखभाल खर्चात वाढ होऊ लागला आहे. आणखी काही काळ संप असाच सुरू राहिल्यास एसटी महामंडळाला कोट्यवधी रूपयांच्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे.

दोन महिन्यात 60 बसेस फोडल्या -

एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेत कामावर रुजू होण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले होते. महामंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील काही आगारांमधील एसटी वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, दुसरीकडे संपकऱ्या कर्मचाऱ्यांचा विरोध कायम आहे. गेल्या दोन महिन्यात राज्यभरातील 60 एसटी बसेसवर दगडफेक करण्यात असून 25 लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान एसटी महामंडळाला झाला आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

....फक्त एक हजार बसेस रस्त्यावर -

सध्या राज्यभरात 250 आगारांपैकी 158 आगार सुरू झाले आहे. तर 92 आगार संपामुळे अजूनही बंद आहे. 158 आगारांतून सुमारे 15 हजार बसेसपैकी एक हजार बसेस बाहेर पडत आहे. उर्वरित 14 हजार बसेस आजही आगारात उभ्या आहे. यामुळे बसेसच नुकसान होत आहे. एसटी महामंडळ सर्व बसेसला सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, कर्मचारी कामावर येत नसल्याने या बसेस व्यस्थापन करणे कठीण झाले आहे.

हे ही वाचा - ST Worker Strike : एसटी संपाचे भिजत घोंगडे; 563 एसटी कर्मचारी बडतर्फ, आतापर्यंत 10 हजार कर्मचारी निलंबीत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.