ETV Bharat / state

कांदा आणखी दोन महिने रडवणार! पावसाने केला कांद्याचा वांदा, पालेभाज्याही कडाडल्या - पाऊस भाजीपाला दर परिणाम

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांसोबतच भाजीपाला आणि कांद्याचे नुकसान झाले आहे. परिणामी बाजारात दरवाढ दिसत आहे.

Vegetables
भाजीपाला
author img

By

Published : Oct 20, 2020, 12:19 PM IST

Updated : Oct 20, 2020, 12:54 PM IST

नवी मुंबई - अवकाळी पावसाचा फटका पालेभाज्यांसह कांद्याला बसला आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांकडे आता कांदा शिल्लक नाही. नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी किमान महिना-दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होण्याची शक्‍यता नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

येत्या काही दिवसात कांद्याच्या दरांंमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली

नवी मुंबईत कांद्याच्या भावाने ३ हजार ९०० रुपये क्विंटलवरून ४ हजार १०० रुपये क्विंटलपर्यंत उसळी खाल्ली आहे. किरकोळ बाजारात कांदा प्रति किलो ६० ते ७० रुपयांनी विकला जात आहे, तर जुना कांदा ८० ते १०० रुपये दराने विकला जात आहे. घाऊक बाजारात कांदा ४५ ते ५० रुपये किलोने विकला जात आहे. काही दिवसांपूर्वीच देशात कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक होता. मात्र, साठवलेला कांदा आणि शेतातील कांदा दोन्हीही पावसामुळे खराब झाले आहेत. परिणामी आता बाजारात कांदा येत नसल्याचे चित्र दिसत आहे.

परतीच्या पावसामुळे सर्वात जास्त पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. पाऊस लागल्याने पालेभाज्या सडून जात आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात देखील पालेभाज्या चढ्या दराने विकल्या जात आहेत.

पालेभाज्यांचे दर -

  • मेथी मोठी जुडी - ४० रुपये
  • पालक - २५ ते ३० रुपये
  • शेपू - ३० ते ३५ रुपये
  • चाकवत - २० ते २५ रुपये
  • चवळी - २५ ते ३० रुपये
  • कांदा पात - ३० रुपये
  • माठ - ३० रुपये
    कोथिंबीर जुडी घाऊक बाजारपेठेत ५० रुपयांना असून किरकोळ बाजरात हीच कोथिंबीर जुडी १२० रुपयांनी विकली जात आहे. इतर वेळी घाऊक बाजारात कोंथिंबीर जुडी ७ ते ८ रुपयांनी विकली जाते व किरकोळ बाजारात ३० रुपयांना. नेहमी मेथीची जुडी घाऊक बाजारात ८ ते ९ रुपयांनी विकली जाते मात्र, सध्या मेथी ४० रुपयांनी विकली जात आहे. १० रुपयात मिळणारी पालकची जुडी २५ रुपये दराने विकली जात आहे.
    कांद्याचे दर -
    जुना कांदा किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे तर, नवीन कांदा ६० ते ७०रुपये दराने विकला जात आहे.

Last Updated : Oct 20, 2020, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.