ETV Bharat / state

अपक्षांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ पोहचले ६० वर

विधानसभा निवडणुकीत ५६ जागा मिळवलेल्या शिवसेनेला ४ आमदारांचा पाठिंबा मिळाला असून सेनेचे संख्याबळ आता ६० झाले आहे. तर येत्या दोन दिवसात अनेक आमदार शिवसेनेला पाठिंबा जाहीर करणार असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजप व सेना यांच्यात सत्ता स्थापनेसाठी येत्या काही दिवसात मोठी साठमारी दिसण्याची शक्यता आहे.

शिवसेना
author img

By

Published : Oct 27, 2019, 11:32 PM IST

मुंबई- विधानसभा निवडणुकीत ५६ जागा मिळवलेल्या शिवसेनेला ४ आमदारांचा पाठिंबा मिळाला असून सेनेचे संख्याबळ आता ६० झाले आहे. तर येत्या दोन दिवसात अनेक आमदार शिवसेनेला पाठिंबा जाहीर करणार असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजप व सेना यांच्यात सत्ता स्थापनेसाठी येत्या काही दिवसात मोठी साठमारी दिसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नाशिक पूर्व मतदारसंघात नुकताच पराभवाचा सामना करावा लागलेले बाळासाहेब सानप यांनी रविवारी मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सानप यांना शिवबंधन बांधले. यावेळी राऊत यांनी भाजपने त्यांना असलेल्या २० आमदारांचे समर्थन दाखवावे, असे आपल्या मित्रपक्षाला थेट आव्हान दिले. शनिवारी रात्री प्रहार जनशक्तीचे अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि मेळघाटचे राजकुमार पटेल यांनी मातोश्री येथे जाऊन सेनेबरोबर असल्याचे सांगितले. यामध्ये ठाण्याचे नेते एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली.

त्याबरोबरच, विदर्भातील रामटेकचे आशिष जयस्वाल आणि भंडाऱ्याचे नरेंद्र गोंडेकर या सेनेच्या बंडखोर आमदारांनी मातोश्री येथे जाऊन सेनेबरोबर असल्याचे सांगितले. या दोघा आमदारांना अनिल देसाई यांनी मातोश्रीपर्यंत आणले. अशा प्रकारे सेनेचे ५६ असलेले संख्याबळ ६० झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील तर इचलकरंजीमध्ये प्रकाश आवाडे हे सेनेचे दोन बंडखोर निवडून आले आहेत. तेसुद्धा सेनेच्या मागे जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे सेनेचे संख्याबळ ६२ पर्यंत जाऊ शकते.

३० ऑक्टोबर रोजी भाजपच्या विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक आहे. अमित शहा मुंबईत येत आहेत. मागच्या प्रमाणे भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याची मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी भूमिका घेईल, असे म्हणत २०१४ ला शरद पवार यांनी भाजपला स्वबळावर सत्तेसाठी पाठिंबा दिला होता. आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत, असे यावेळी पवारांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे २०१४ प्रमाणे भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

भाजपला २० आमदारांचा पाठिंबा?

भाजपकडे १०५ आमदारांचे संख्याबळ आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपला २० आमदारांचा पाठींबा असल्याचे सुतोवाच रविवारी कोल्हापुरात केला होता. त्यामध्ये, राजा राऊत (बार्शी), गीता जैन (मिरा-भाईंदर), महेश बालदी (उरण), मंजुला गावीत ( साक्री ), अनिल चौधरी (रावेर), किशोर जोरगवार (चंद्रपूर), विनोद आगरवाल (गोंदीया) यासह जनसुराज्य आणि रासप यांचे प्रत्येती एकअशा ९ आमदारांचा त्यात समावेश आहे.

असे आहे राज्यात पक्षीय बलाबल

भाजप- १०५, शिवसेना - ५६, राष्ट्रवादी काँग्रेस- ५४, काँग्रेस- ४४, बहुजन विकास आघाडी- ३, एमआयएम- २, समाजवादी पार्टी- २, प्रहार जनशक्ती पार्टी- २, माकप- १, जनसुराज्य शक्ती- १, क्रांतिकारी शेतकरी पार्टी- १, महाराष्ट्र नवनिर्माण सेना- १, राष्ट्रीय समाज पक्ष- १, स्वाभिमानी पक्ष- १, शेकाप - १, अपक्ष- १३, एकूण जागा- २८८.

हेही वाचा- तलवारीच्या धाकेवर आईस्क्रीम विक्रेत्याला लुटणाऱ्या निग्रो नागरिकाला अटक

Intro:अपक्षांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६० वर पोचले

mh-mum-01-sena-bjp-sport-mla-7201153

(यासाठी फाईल फुटे ज वापरावेत)

मुंबई, ता. २७ :
विधानसभा निवडणुकीत ५६ जागा मिळवलेल्या शिवसेनेला ४ आमदारांचा पाठिंबा मिळाला असून सेनेचे संख्याबळ आता ६० झाले आहे. तर येत्या दोन दिवसात अनेक आमदार शिवसेनेला पाठिंबा जाहीर देणार असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजप व सेना यांच्यात सत्ता स्थापनेसाठी येत्या काही दिवसात मोठी साठमारी दिसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नाशिक पूर्व मतदारसंघात नुकताच पराभवाचा सामना करावा लागलेले बाळासाहेब सानप यांनी रविवारी मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सानप यांना शिवबंधन बांधले. यावेळी राऊत यांनी भाजपने त्यांना असलेल्या २० आमदारांचे समर्थन दाखवावे, असे आपल्या मित्रपक्षाला थेट आव्हान दिले. शनिवारी रात्री प्रहार जनशक्तीचे अचरपुरचे आमदार बच्चू कडू आणि मेळघाटचे राजकुमार पटेल यांनी मातोश्री येथे जाऊन सेनेबरोबर असल्याचे सांगितले. यामध्ये ठाण्याचे नेते एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली. त्याबरोबरच विदर्भातील रामटेकचे आशिष जैयस्वाल आणि भंडाराचे नरेंद्र गोंडेकर या सेनेच्या बंडखोर आमदारांनी मातोश्री येथे जाऊन सेनेबरोबर असल्याचे सांगितले. या दोघा आमदारांना अनिल देसाई यांनी मातोश्रीपर्यंत आणले. अशा प्रकारे सेनेचे ५६ असलेले संख्याबळ ६० झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मध्ये चंद्रकांत पाटील तर इचलकरंजीमध्ये प्रकाश आवाडे हे सेनेचे दोन बंडखोर निवडून आले आहेत. तेसुद्धा सेनेच्या मागे जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे सेनेचे संख्याबळ ६२ पर्यंत जाऊ शकते.
३० आॅक्टोबर रोजी भाजपच्या विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक आहे. अमित शहा मुंबईत येत आहेत. ३१ आॅक्टोबर रोजी भाजप मागच्या प्रमाणे स्बळावर सत्ता स्थापन करणार असल्याच्या मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी भूमिका घेईल, असे म्हणत २०१४ ला शरद पवार यांनी भाजपला स्वबळावर सत्तेसाठी पाठिंबा दिला होता. आम्ही विरोध पक्षात बसणार आहोत, असे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे २०१४ प्रमाणे भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

...
भाजपला २० आमदारांचा पाठिंबा?
भाजपकडे १०५ संख्याबळ आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपला २० आमदारांचा पाठींबा असल्याचे सूतोवाच रविवारी कोल्हापुरात केले. त्यामध्ये १. राजा राऊत (बार्शी), २. गीता जैन (मिरा-भाईंदर), ३. महेश बालदी (उरण), ४. मंजुला गावीत ( साक्री ), ५. अनिल चौधरी (रावेर), ६. किशोर जोरगवार (चंद्रपूर), ७. विनोद आगरवाल (गोंदीया) यासह जनसुराज्य आणि रासप यांचा एकएक अशा ९ आमदारांचा त्यात समावेश आहे..

....

असे आहे राज्यात पक्षीय बलाबल -

भाजप- १०५, शिवसेना - ५६, राष्ट्रवादी काँग्रेस- ५४, काँग्रेस- ४४, बहुजन विकास आघाडी- ३, एमआयएम- २
समाजवादी पार्टी- २, प्रहार जनशक्ती पार्टी- २,माकप- १, जनसुराज्य शक्ती- १, क्रांतिकारी शेतकरी पार्टी- १, महाराष्ट्र नवनिर्माण सेना- १, राष्ट्रीय समाज पक्ष- १, स्वाभिमानी पक्ष- १, शेकाप - १, अपक्ष- १३, एकूण जागा- २८८.
--
Body:अपक्षांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६० वर पोचले
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.